मुंबई : आयपीएल 2024 च्या ऑक्शनआधी सर्व संघांनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएल ट्रॉफीवर सर्वाधिकवेळा नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्स संघानेही आपली यादी जाहीर केलीये. यावेळी टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला असून दोन सीझन पाण्यासारखा पैसा ओतलेल्या खेळाडूल रिलीज केलं आहे.
अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शोकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जॅनसेन, रिचर्डसन, रिले मेरेडिथ, ख्रिस जॉर्डन, संदीप वॉरियर. या खेळाडूंना रिलीज करण्याचा मुंबईने निर्णय घेतला असून यामधील सर्वात मोठा खेळाडू म्हणजे जोफ्रा आर्चर आहे. जोफ्रासाठी एक सीझन थांबलेल्या पलटणला दुसऱ्या वर्षाहीसुद्धा त्याने खास काही करून दाखवलं नाही.
रोहित शर्मा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, स्काय, इशान किशन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, कॅम ग्रीन, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड (ट्रेड)
A big 𝐓𝐇𝐀𝐍𝐊 𝐘𝐎𝐔 to all our departing players for their contribution and journey with #MumbaiIndians 🙌
Always a part of #OneFamily 💙#MumbaiMeriJaan pic.twitter.com/HZYEVd1q19
— Mumbai Indians (@mipaltan) November 26, 2023
मुंबई संघ यंदा हार्दिकला घेण्यासाठी आतुर असलेली पाहायला मिळाली. आज खेळाडंची यादी जरी जाहीर झाली असली तरी गुजरातकडून अधिकृतपणे पोस्ट केली नाही. आता असंही समजत आहे की मुंबईने ग्रीनला आरसीसीबीसोबत ट्रेड करत ती रक्कम हार्दिकला घेण्यासाठी वापरली आहे. मात्र याबाबत ना मुंबई ना गुजरात कोणत्याच संघाने अधिकृतपणे काही सांगितलं नाही.