आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समधील सामन्यामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. मुंबईचा नवीन कॅप्टन हार्दिक पंड्याने रोहित शर्मासोबत चुकीच्या पद्धतीने वर्तन केल्याचं म्हणत चाहत्यांनी त्याला धारेवर धरलं. हार्दिकचे हावभावही सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसले. मुंबई आणि रोहितचे चाहते पंड्यावर चांगलेच चिडलेले दिसले. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रोहितची पत्नी रितिकाला हार्दिक पंड्याने मिठी मारली.
होळीच्या सणादिवशी मुंबईने इंडियन्सच्या खेळाडूंसाठी खास पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये रोहित शर्माच्या पत्नी रितिकाला हार्दिक पंड्या याने मिठी मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हार्दिक त्यावेळी राहितची मुलगी समायराशी बोलला. या पार्टीमधील रोहितने डान्स केला त्यासोबतच होळीच्या सणाचा आनंद घेताना दिसला.
रविवारी मैदानात अपमान, सोमवारी हार्दिक पंड्याने रोहितची पत्नीचा रितिकाला होळी खेळताना मिठी करतानाचा व्हिडीओ व्हायरल @mipaltan #MumbaiIndians pic.twitter.com/XtL5wP0MkP
— Harish Malusare (@harish_malusare) March 25, 2024
यंदाच्या हंगामातील मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरात टायटन्स संघासोबत होता. या सामन्यामध्ये रोहितला पंड्याने 30 यार्ड सर्कलमधून बाहेर सीमारेषेवर पाठवलं होतं. हार्दिकने पाठवलं असतं तर काही हरकत नव्हती परंतु त्याचे हावभाव अत्यंत खुनशी होते, असं चाहत्यांचं म्हणणं होतं. रोहितसोबत पंड्या तशा प्रकारे वागल्याने त्याच्यावर सडकून टीका होत आहे.
दरम्यान, पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. गुजरात टायटन्सने प्रथम बॅटींग करताना 20 ओव्हरमध्ये 168-6 धावा केल्या होत्या. गुजरात संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठालाग करताना मुंबईची गाडी मागेच अडकली.पलटणला 20 ओव्हरमध्ये 162-9 धावा करता आल्या.