मुंबई : गेल्या अनेक दिवासांपासून क्रीडा प्रेक्षकांना आयपीएलच्या तारखा जाहीर होतात याची आस लागली होती. अखेर आज आयपीएलच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आयपीएल पुढील महिन्यातील 22 मार्चपासून सुरू होत आहे. यंदाच्या मोसमातील पहिला सामना सीएके आणी आरसीबी या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. यंदाची आयपीएल सुरू होण्याआधी मोठा उलटफेर पाहायला मिळाला होता. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची हार्दिक पंड्या याच्याकडे धुरा सोपवण्यात आली आहे. गुजरात संघाचं कर्णधारपद असतानाही पंड्याने गुजरात संघाची साथ सोडली होती. आज वेळापत्रकामध्ये एक सामन्याने सर्वांच्या नजरा खेचल्या आहेत. सोशल मीडियावरही या सामन्यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
यंदाच्या आयपीएलमध्ये वेळापत्रक तुम्ही नीट आणि बारकाईने पाहिलं असेल त्यामध्ये तुम्ही तर 24 मार्चला पाहा कोणत्या संघांमध्ये सामना होणार आहे. जर नीट नसेल पाहिलं तर बघा, 24 मार्चला मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना ठरवून लावल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. याचं वेगळं कारण काही सांगायल नको.
हार्दिक पंड्या याने मुंबई सोडल्यावर तो गुजरात टायटन्स संघाचा कॅप्टन झाला होता. पहिल्याच मोसमात आपल्या संघाला त्याने विजेतेपद जिंकवून दिलं होतं. तर दुसऱ्या वर्षी फायनलमध्ये पराभव झाला होता. त्यानंतर यंदाच्या आयपीएलआधी पंड्याला मुंबईने आपल्याडकडे घेतलं. बरं फक्त घेतलंच नाहीतर थेट कॅप्टनसीचं ऑफरलेटरही दिलं. मुंबईच्या टीम मॅनेजमेंटने रोहित शर्मा याला बाजूला करत हार्दिकला कॅप्टन केलं. मुंबईच्या चाहत्यांचा रोषाला सामोर जावं लागलं होतं. तरीही मुंबईने आपला निर्णय काही बदलला नाही.
आता आयपीएल सुरू होण्याआधी गुजरात संघाचा पहिला सामना मुंबईसोबत होणार आहे. या सामन्यामध्ये गुजरात संघाचा माजी कॅप्टन असलेला पंड्या मुंबईच्याबाजूने खेळणार आहे. नेटकऱ्यांनी याचाच धाग पकडत मीम्स व्हायरल केले आहेत. काहींनी तर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनीच हा सामना ठरवून पहिला ठेवल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर पंड्यावर अनेक मीम्स केले जात असून त्याला ट्रोल केलं जात आहे.
दरम्यान, वर्ल्ड कपमध्ये दुखापत झाल्यावर पंड्याने अजुनही मैदानात यायचं काही नाव घेतलं नाही. मात्र बडोद्यामध्ये तो सराव करताना दिसला. देशांतर्गत क्रिकेटमध्येही पंड्या खेळला नसून आता थेट मुंबईकडूनच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. याच पार्श्वभूमीवर हा सामना आज नियोजनबद्ध असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.