मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेची सर्व क्रिकेटप्रेमींनी उत्सुकता लागलेली आहे. दहा दिवसांनी म्हणजेच अवघ्या 22 मार्चला सुरूवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असणार आहे. हार्दिक पंड्या याला मुंबईने ट्रेड करत आपल्या ताफ्यात सामील केलेलं. रोहित शर्मा याला कर्णधारपदावरून बाजूला करत हार्दिकला कॅप्टन केलं. त्यामुळे एमआयचे चाहते नाराज झालेत. अशातच यंदाच्या मोसमाला सुरूवात नाही झाली तर सूर्याबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे.
मुंबई इंडियन्स संघाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव जगाला माहित आहे. एकदा सेट झाला की समोरच्या टीमचा धुरळा उडणार हे नक्कीच. कारण सुर्यकुमार यादव याने 360 डिग्री स्टाईल फलंदाजी करत दाखवून दिलं आहे. टीम इंडियासाठी खेळतानाही त्याने अनेक धुवांधार खेळी करत विजय मिळवून दिलेत. वर्ल्ड कपनंतर सुर्याकडे टी-20 टीमचं कर्णधारपदही देण्यात आलं होतं. मॅनेजमेंटने दिलेली जबाबदारी पार पाडत युवा खेळाडूंच्या मदतीने टीमसाठी महत्त्वाचं योगदान दिलं होतं.
या दौऱ्यानंतर सुर्यावर हर्नियाची सर्जरी झाली होती. या सर्जरीमुळे तो क्रिकेटपासून दूर आहे मात्र आता तो फिट असल्याची माहिती समोर येत होती. मात्र संघासाठी एक वाईट अपडेट आहे, सुर्या हा पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नसल्याची माहिती समजत आहे. गुजरातनंतर मुंबईला दुसरा सामना 27 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आहे.
दरम्यान, सुर्यकुमार फिटनेसवर मेहनत घेत असलेला पाहायला मिळाला. इंस्टाग्रामवर त्याने आपला सराव करतानाचा फोटो शेअर केला होता. सुर्यकुमार लवकरात लवकर फिट होणं संघासाठी महत्त्वाचं आहे. कारण सुर्या म्हणजे संघाचा मजबूत पिलर आहे.