मुंबई | आयपीएलच्या 17 व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी आणखी काही महिने बाकी आहेत. त्याआधी दुबईत लिलाव पार पडणार आहे. मुंबई इंडियन्सने त्याआधी कॅप्टन बदलला आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हटवून ती जबाबदारी हार्दिक पंड्या याच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. हार्दिक पंड्या याला काही दिवसांपूर्वीच ट्रान्सफर विंडोद्वारे गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये घेण्यात आलं. आता त्यानंतर थेट रोहितच्या जागी हार्दिकला कॅप्टन केल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला एक नाही, दोन नाही, तब्बल 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. मुंबई इंडियन्सने गेल्या मोसमातही प्लेऑफपर्यंत मजल मारली. कर्णधार कसा असावा याचं उत्तर आदर्श हा रोहितने घालून दिला होता. रोहितने आपल्या कॅप्टन्सीत मुंबई इंडियन्सला एका वेगळ्या उंचीवर आणून ठेवलं होतं. आयपीएल 2024 ऑक्शनची तयारी सुरु असताना अचानक कॅप्टन बदलण्याच्या निर्णयामुळे नेटकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.
“कोळश्याच्या शोधात मुंबई इंडियन्सने हिरा गमावला”, अशा आशयाची पोस्ट हार्दिक आणि रोहितच्या फोटोसह सोशल मीडियावरुन व्हायरल झाली आहे. तसेच एका नेटकऱ्याने रोहित शर्माचे आयपीएल ट्रॉफीसोबतचे फोटो पोस्ट करत म्हटलंय की “आज तो दिवस आहे जेव्हा मला रोहित शर्माबद्दल वाईट वाटलेच तर अश्रूही आले. मी रोहितचा नुकताच चाहता झालो होतो. त्याला इतक्या लवकर आयपीएलमधील कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी काय केले नाही, त्याने पाच ट्रॉफी जिंकून दिल्या. तरीही त्याला दूधातील माशीप्रमाणे काढण्यात आला. एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, भांडवलशाहीला फक्त नफा समजतो भावना नाही.”, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय.
ती पोस्ट व्हायरल
आज वो दिन है जब मुझे रोहित शर्मा के लिए बुरा ही नहीं लगा बल्कि आंसू भी आ गए। यार मैं अभी तो रोहित शर्मा का फैन बना था और उन्हें इतनी जल्दी IPL में कप्तानी से भी हटा दिया।
रोहित शर्मा ने क्या नहीं किया मुम्बई इंडियंस के लिए, पांच पांच ट्रॉफी जितवाई हैं फिर भी उन्हें दूध से मक्खी… pic.twitter.com/QXsa48oKfG
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) December 15, 2023
दरम्यान मुंबई इंडियन्सची गेल्या 3 वर्षांपासून आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. मुंबई इंडियन्सला 2021 मध्ये प्लेऑफमध्येही पोहचता आलं नाही. पलटण 2022 साली पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून पहिल्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर होती.
‘कोळश्याच्या नादात हिरा गमावला’
By making Hardik Pandya captain Mumbai Indians has lost a Diamond like Rohit Sharma 💔#MumbaiIndians pic.twitter.com/MGjgal7yJD
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) December 15, 2023
तर गेल्या हंगामात मुंबईने प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. मुंबईला क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्सकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे आता मुंबईला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्याची जबाबदारी ही हार्दिकच्या खांद्यावर असणार आहे.