आयपीएलच्या 17 व्या मोसमाला 23 मार्चपासून सुरुवात झाली. सीएसकेने सलामीच्या सामन्यात आरसीबीवर 6 विकेट्सने विजय मिळवला. सीएसकेकडून मुस्तफिजुर रहमान याने पहिल्याच सामन्यात 4 विकेट्स घेत जोरदार सुरुवात केली. तसेच शनिवारी 23 मार्च रोजी डबल हेडर पार पडलं. पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला. तर डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात केकेआरने हैदराबादवर 4 धावांनी मात केली. चेन्नईच्या मुस्तफिजुर रहमान याच्याकडे या डबल हेडरनंतर पर्पल कॅप कायम आहे. मात्र पर्पल कॅपच्या यादीत बरेच बदल झाले आहेत.
डबल हेडरमधील पहिल्याच सामन्यात अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव या दोघांना प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर शनिवार 23 मार्चच्या दुसऱ्या सामन्यात हैदराबादच्या टी नटराजन आणि केकेआरच्या हर्षित राणा या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे टॉप 5 मध्ये बदल झाला आहे. डबल हेडरआधी टॉप 5 मध्ये टेबल टॉपर मुस्तफिजुर याचा अपवाद वगळता दुसरे गोलंदाज होते. दुसऱ्या चौथ्या क्रमांकापर्यंत अनुक्रमे कॅमरुन ग्रीन, दीपक चाहर, यश दयाल आणि कर्ण शर्मा यांचा समावेश होता.मात्र आता चित्र बदललंय.
कॅमरुन ग्रीन डबल हेडरनंतर दुसऱ्या क्रमांकावरुन सहाव्या स्थानी घसरला आहे. दीपक चाहर तिसऱ्या क्रमांकावरुन 17 व्या स्थानी फेकला गेला आहे. चौथ्या क्रमांकावरील यश दयाल 18 व्या क्रमांकावर गेला. तर पाचव्या स्थानी असलेला कर्ण शर्मा 19 व्या क्रमांकावर गेला आहे. तर इतर गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट चांगला असल्याने ते 1 विकेटसह ते टॉपमध्ये आले आहेत.
गोलंदाज | सामने | इकॉनोमी | विकेट्स |
---|---|---|---|
मुस्तफिझुर रहमान | 3 | 8.83 | 7 |
मयंक यादव | 3 | 5.12 | 6 |
युजवेंद्र चहल | 3 | 5.50 | 6 |
मोहित शर्मा | 3 | 7.75 | 6 |
खलील अहमद | 4 | 8.18 | 6 |
सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेईंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
दिल्ली कॅपिटल्स प्लेईंग इलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद आणि इशांत शर्मा.
पंजाब किंग्ज प्लेईंग इलेव्हन : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग.