IPL 2024 PBKS vs GT Live Streaming : घरच्या मैदानात गुजरातशी सामना, पंजाबसमोर विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान

| Updated on: Apr 20, 2024 | 4:07 PM

Punjab Kings vs Gujarat Titans Live Streaming : आयपीएलच्या 17 व्या मोसमात आतापर्यंत प्रत्येक संघाने किमान 6 सामने खेळले आहेत. त्यामुळे आता प्लेऑफसाठी स्पर्धा सुरु झाली आहे. पंजाब आणि गुजरात दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा असणार आहे.

IPL 2024 PBKS vs GT Live Streaming : घरच्या मैदानात गुजरातशी सामना, पंजाबसमोर विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान
pbks vs gt ipl,
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमात रविवारी 21 एप्रिल रोजी डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडमध्ये या हंगामातील 36 आणि 37 वा सामना पार पडणार आहे. कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यात पहिला सामना होणार आहे. हा सामना दुपारी साडे तीन वाजता सुरु होईल. तर दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स भिडणार आहेत. शिखर धवन पंजाब किंग्सचा कॅप्टन आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरातची सूत्रं आहेत. गुजरातने आपला गेला सामना गमावला आहे. तर पंजाबने पराभवाची हॅटट्रिक साधली आहे. गुजरात आणि पंजाब या दोन्ही संघांचा हा या मोसमातील आठवा सामना असणार आहे. पंजाबने 7 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर गुजरातने 7 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. गुजरात आणि पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानी विराजमान आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असा आहे.

पंजाब विरुद्ध गुजरात सामना केव्हा?

पंजाब विरुद्ध गुजरात सामना रविवारी 21 एप्रिल रोजी होणार आहे.

पंजाब विरुद्ध गुजरात सामना कुठे?

पंजाब विरुद्ध गुजरात सामना महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर चढींगड येथे होणार आहे.

पंजाब विरुद्ध गुजरात सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

पंजाब विरुद्ध गुजरात सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

पंजाब विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

पंजाब विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

पंजाब विरुद्ध गुजरात सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

पंजाब विरुद्ध गुजरात सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर मोफत पाहायला मिळेल.

पंजाब किंग्स टीम : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हरप्रीत सिंग भाटिया, प्रभसिमरन सिंग, रायली रोसो, जितेश शर्मा, सॅम कुरान, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, शिवम सिंग, सिकंदर रझा, अथर्व तायडे, ख्रिस वोक्स, अर्शदीप सिंग, राहुल चहर, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, विद्वथ कवेरप्पा, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, प्रिन्स चौधरी, आशुतोष शर्मा, विश्वनाथ सिंग आणि तनय त्यागराजन.

गुजरात टायटन्स टीम : शुबमन गिल (कॅप्टन), डेव्हिड मिलर, रिद्धिमान साहा, साई सुधारसन, शाहरुख खान, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, अजमतुल्ला ओमरझई, अभिनव मनोहर, रशीद खान, विजय शंकर, राहुल तेवतिया, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जोशुआ लिटल, दर्शन नळकाडे, नूर अहमद, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहित शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, सुशांत मिश्रा, संदीप वॉरियर, शरथ बीआर आणि मानव सुथार.