मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात गुरुवारी 18 एप्रिल रोजी पंजाब किंग्सवर थरारक विजय मिळवला. मुंबईने पंजाबवर 9 धावांनी मात केली. मुंबईने पहिल्या डावात टॉस जिंकून 192 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकडून सूर्यकुमार यादव याने 53 बॉलमध्ये 78 धावांची खेळी केली. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 192 धावा केल्या. त्यानंतर पंजाबने चांगली लढत दिली. मात्र पंजाबचा डाव हा 19.1 ओव्हरमध्ये 183 धावांवर आटोपला. मुंबई इंडियन्सला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये चांगलाच फायदा झाला. मुंबई सातव्या स्थानी पोहचली.
मुंबईने दिलेल्या विजयी धावांचा पाठलाग करताना पंजाबची 4 बाद 14 अशी नाजूत स्थिती झाली.त्यानंतर आशुतोष शर्मा आणि शशांक सिंह या दोघांनी पंजाबचा डाव सावरला. शशांक सिंह याने 25 बॉलमध्ये 41 धावांची खेळी केली. शशांकच्या या खेळीने पंजाबच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. तर आशुतोष शर्मा याने आपल्या 61 धावांच्या खेळीत 7 सिक्स आणि 2 चौकार ठोकले. आशुतोषने आठव्या विकेटसाठी हरप्रीत ब्रार याच्यासह 32 बॉलमध्ये 57 धावांची भागीदारी केली. हरप्रीतने 21 धावांचं योगदान दिलं.
शंशाक सिंह याने 3 निर्णायक भागीदारी करत मुंबईचं टेन्शन वाढवलं. शशांकने पाचव्या विकेटसाठी 28 बॉलमध्ये 35 धावांची भागीदारी केली. जितेश शर्मा याच्यासह सहाव्या विकेटसाठी 15 बॉलमध्ये 28 धावा जोडल्या. तर आशुतोषसह 17 बॉलमध्ये 34 धावांची भागीदारी केली. या सर्व भागीदारींमुळे सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला. पंजाबला झटपट 4 झटके दिल्यानंतर मुंबई हा सामना पंजाबला 10 ओव्हरच्या आत गुंडाळून विजय मिळवणार असं चित्र होतं. मात्र पंजाबच्या फलंदाजांनी सामना शेवटपर्यंत खेचला.
पंजाबला विजयसाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 12 धावांची गरज होती. तर हातात 1 विकेट होती. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने आकाश मढवाल याला शेवटची निर्णायक ओव्हर टाकायला दिली. मात्र त्यानंतर मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने मढवालसह फिल्डिंग सेट केली. रोहितचा आकाश आणि हार्दिकसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे.
रोहितने मोहम्मद नबी याला डीप कवरवर फिल्डिंगसाठी पाठवलं. मढवालने पहिला टाकलेला बॉल वाईट ठरला. त्यानंतर आकाशने टाकलेला बॉल कगिसो रबाडा याने डीप कव्हरच्या दिशेने गेला. मोहम्मद नबी तिथे होता. रबाडाने सिंगल घेतल्यानंतर दुसऱ्या रनसाठी धावला. मात्र तोवर नबीने अचूक थ्रो केला आणि रबाडा रन ाऊट झाला. मुंबईने अशाप्रकारे सामना 9 धावांनी खिशात घातला.
आकाशकडून हार्दिककडे दुर्लक्ष
My guy, Madhwal was trying his best not to look at Hardik 😭😭😭 pic.twitter.com/DlWlHj2BV7
— ab (rohit’s version) (@ydisskolaveridi) April 18, 2024
पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.
मुंबई इंडियन्स प्लेईंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल आणि जसप्रीत बुमराह.