PBKS vs RCB : कोहलीची ‘विराट’ कामगिरी, अशी कामगिरी करणारा दुसराच फलंदाज

| Updated on: May 09, 2024 | 10:05 PM

Virat Kohli PBKS vs RCB : विराट कोहलीने पंजाब विरुद्धच्या करो या मरो सामन्यात 92 धावांची खेळी केली. विराटने यासह मोठ्या विक्रमाची बरोबरी केली.

PBKS vs RCB : कोहलीची विराट कामगिरी, अशी कामगिरी करणारा दुसराच फलंदाज
rcb virat kohli,
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

रनमशीन अर्थात विराट कोहली याने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 58 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध 92 धावांची स्फोटक खेळी केली. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राखण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो या मरो’ असा आहे. या सामन्यात पंजाबने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विराट कोहली याने या निर्णयाचा पूर्ण फायदा घेतला. विराटला शतक ठोकता आलं नाही. मात्र त्याने 92 धावांच्या खेळीसह मोठा विक्रम केला आहे.

विराटने पंजाब विरुद्ध 32 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. विराटचं हे या हंगामातील 5 वं अर्धशतक ठरलं. विराटने अर्धशतकानंतर टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली. विराट शतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचला मात्र नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. विराटचं शतक अवघ्या 8 धावांनी हुकलं. विराटने 7 चौकार आणि 6 सिक्सच्या मदतीने 195.74 च्या स्ट्राईक रेटने 92 धावांची खेळी केली. विराटने या खेळीदरम्यान या हंगामातील 600 धावांचा टप्पा पूर्ण केला. विराट आयपीएलमध्ये एकूण 4 वेळा हंगामात 600 पेक्षा अधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. विराटने केएल राहुलच्या विक्रमाची बरोबरी केली. केएल आणि विराटशिवाय आतापर्यंत कुणालाही 4 हंगामात 600 पेक्षा अधिक धावा करता आलेल्या नाहीत. ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनी प्रत्येकी 3 वेळा 600 पेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी केली आहे.

पंजाबला 242 धावांचं आव्हान

दरम्यान विराटच्या 92, रजत पाटीदार 55 आणि कॅमरुन ग्रीन याच्या 46 धावांच्या जोरावर आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 241 धावा केल्या. त्यामुळे आता या आरपारच्या लढाईत आपलं स्थान कायम राखायचं असेल, तर पंजाबला 242 धावा कराव्या लागणार आहेत.

विराट कामगिरी

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटीकपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन.

पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, रायली रोसो, शशांक सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, आशुतोष शर्मा, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग आणि विद्वत कवेरप्पा.