आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 27 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने भिडणार आहेत. शिखर धवन याच्याकडे पंजाब किंग्सचं नेतृत्व आहे. तर संजू सॅमसन राजस्थानची धुरा सांभाळणार आहे. पंजाब आणि राजस्थान या दोन्ही संघांचा हा सहावा सामना आहे. राजस्थानने सलग 4 सामने जिंकले. त्यानंतर पाचव्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानचा विजय रथ रोखला. राजस्थान 4 विजय आणि 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी आहे. तर दुसऱ्या बाजूला पंजाबने 5 पैकी 3 सामने गमावलेत तर 2 जिंकलेत. पंजाब 2 विजयासह आठव्या क्रमांकावर आहे. राजस्थान आणि पंजाब दोन्ही संघांनी आपला अखेरचा सामना गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना शनिवारी 13 एप्रिल रोजी होणार आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना हा महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंडीगढ येथे होणार आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर फुकटात पाहता येईल.
पंजाब किंग्स टीम : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हरप्रीत सिंग भाटिया, प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, जितेश शर्मा, सॅम कुरान, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, शिवम सिंग, सिकंदर रझा, अथर्व तायडे, ख्रिस वोक्स, अर्शदीप सिंग, राहुल चहर, नाथन एलिस, हरप्रीत ब्रार, विद्वथ कवेरप्पा, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, प्रिन्स चौधरी, आशुतोष शर्मा, विश्वनाथ सिंग आणि तनय त्यागराजन.
राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, शुबम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोव्हमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, रविचंद्रन अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक, तनुष कोटियन आणि केशव महाराज.