आयपीएलमधील 27 वा सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. पंजाबच्या चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना असणार आहे. राजस्थानने रॉयल्सने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. मात्र पाचव्या सामन्यात गुजरात टायटन्सने त्यांचा विजयरथ रोखला. दुसरीकडे, पंजाब किंग्सने पाचपैकी 3 सामने गमावले आहेत. त्यामुळे या सामन्यातून पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर परतण्याची धडपड असणार आहे. महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये स्पर्धेतील तिसरा सामना होत आहे. या मैदानावरील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये अतितटीच्या लढती पाहायला मिळाल्या. जर खेळपट्टी अशीच असेल तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणं फायद्याचं ठरू शकतं. या मैदानावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आतापर्यंत 26 वेळा आमनेसामने आले आहेत. यात पंजाब किंग्सने 11 वेळा, तर राजस्थान रॉयल्सने 15 वेळा बाजी मारली आहे.
पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघातील मोजक्या खेळाडूंवर या सामन्याची धुरा असणार आहे. संजू सॅमसन, रियान पराग, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, जोस बटलर, कागिसो रबाडा,सॅम करन, आशुतोष शर्मा, शशांक सिंग हेखेळाडू महत्त्वाची भूमिका बजावतील. यशस्वी जयस्वाल सध्या फॉर्मसाठी धडपडताना दिसत आहे. मात्र त्याला लय सापडण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचे सहा आणि पंजाब किंग्सचे पाच खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावतील. पंजाब किंग्ससाठी जमेची बाजू म्हणजे शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा या दोन अनकॅप्ड खेळाडूंचा फॉर्म..तर राजस्थान रॉयल्ससाठी यशस्वी जयस्वालचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. रविचंद्रन अश्विनही काही खास करू शकलेला नाही. त्यामुळे या खेळाडूंवरही बऱ्याच अंशी नजर असणार आहे.
पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), रिली रोस्सो, सॅम करन, सिकंदर रझा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, कगिसो रबाडा, हर्षल पटेल, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.