मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या मोसमासाठीचं ऑक्शन पार पडलं. त्यानंतर आता साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या 17 व्या मोसमातील ऑक्शनकडे लागून राहिलं आहे. या 17 व्या हंगामासाठी लिलाव 19 डिसेंबरला पार पडणार आहे. या ऑक्शनचं आयोजन हे यंदा दुबईत करण्यात आलं आहे. या ऑक्शनआधी आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने या लिलावात सहभागी झालेल्या खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली आहे. आयपीएलने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरुन ही माहिती दिली आहे.
आयपीएलने सोशल मीडियावरुन दिलेल्या माहितीनुसार, आगामी लिलावात एकूण 333 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आली आहेत. एकूण 1 हजार 1 हजार 166 खेळाडूंमधून या 333 खेळाडूंची नावं ऑक्शनसाठी निश्चित करण्यात आली आहेत. तसेच कोणत्या टीमकडे किती रक्कम आहे, हे देखील जाहीर करण्यात आलं आहे. आता या 333 खेळाडूंपैकी कोणत्या देशातील किती खेळाडू आहेत, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
एकूण 333 खेळाडूंमध्ये 214 भारताीय आहेत. तर 119 खेळाडूंची संख्या 119 आहे. यामध्ये 116 कॅप्ड आणि 215 अनकॅप्ड खेळाडू आहेत. कॅप्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले खेळाडू. तर 2 असोसिएट देशातील खेळाडूंचा समावेश आहे. आता या 333 खेळाडूंपैकी ऑक्शनमधून फक्त 77 खेळाडूंची निवड होणार आहे. त्यातही 77 पैकी 30 खेळाडू हे विदेशी असणार आहेत. या 77 खेळाडूंसाठी एकूण 10 संघांकडे 262.95 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
या लिलावात सहभागी होणाऱ्यांपैकी 23 खेळाडूंची बेस प्राईज ही 2 कोटी आहे. बेस प्राईज म्हणजे या खेळाडूंना आपल्या गोटात घेण्यासाठी तेवढी रक्कम मोजावी लागेल. म्हणजे एखाद्या खेळाडूची बेस प्राईज 2 कोटी आहे तर त्याच्यासाठी किमान तेवढी रक्कम मोजावीच लागेल. तसेच 13 खेळाडूंची बेस प्राईज 1 कोटी 50 लाख रुपये आहे. तर इतर खेळाडूंची बेस प्राईज ही 1 कोटी, 50, 30 आणि 10 लाख रुपये आहे. फ्रँचायजींनी काही खेळाडू हे ट्रान्सफर विंडोद्वारे रिलीज आणि रिटेन म्हणजेच करारमुक्त आणि कायम ठेवले आहेत.
दरम्यान आता या 77 खेळाडूंना एकूण 10 संघांमध्ये गरजेनुसार विभागून घेतलं जाईल. या 10 पैकी गुजरात टायटन्स टीमकडे सर्वाधिक रक्कम आहे. तर सर्वात कमी रक्कम लखनऊ सुपर जायंट्सकडे आहे. कोणत्या टीमकडे किती रक्कम आहे हे जाणून घेऊयात.
लखनऊ सुपर जायंट्स – 13 कोटी 15 लाख
राजस्थान रॉयल्स – 14 कोटी 50 लाख
मुंबई इंडियन्स – 17 कोटी 75 लाख
रॉयल चँलेजर्स बंगळुरु – 23 कोटी 25 लाख
दिल्ली कॅपिट्ल्स – 28 कोटी 95 लाख
पंजाब किंग्स – 29 कोटी 10 लाख
चेन्नई सुपर किंग्स – 31 कोटी 40 लाख
कोलकाता नाईट रायडर्स – 32 कोटी 70 लाख
सनरायजर्स हैदराबाद – 34 कोटी.
गुजरात टायटन्स – 38 कोटी 15 लाख.