आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 70 वा आणि साखळी फेरीतील शेवटचा सामना हा पावसामुळे रद्द झाला आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. मात्र पावसाने खोडा घातल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला आहे. राजस्थानला पावसामुळे दुसऱ्या स्थानी पोहचण्याची संधी गमवावी लागली. त्यामुळे आता राजस्थानला एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे. तसेच सामना रद्द झाल्याने हैदराबादला फायदा झाला आहे. हैदराबादला पावसाने दुसरं स्थान कायम राखण्यात मदत केली. राजस्थानला हा सामना जिंकून दुसरं स्थान काबिज करण्याची संधी होती मात्र पावसाने ते शक्य होऊ दिलं नाही.
नियोजित वेळेनुसार, सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पावसाची बॅटिंग सुरुच होती. ग्राउंड स्टाफच्या अथक परिश्रमानंतर खेळपट्टी खेळण्यासारखी झाली. त्यामुळे रात्री 10 नंतर टॉस झाला. केकेआरने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. सामना 7-7 षटकांचा होणार असल्याचं ठरलं. मात्र टॉसनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. काही मिनिटं पाऊस थांबवण्याची वाट पाहण्यात आली. अखेर सामना रद्द केल्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयासह अखेर प्लेऑफ 1 आणि एलिमिनेटरमध्ये कोण खेळणार हे निश्चित झालं.
केकेआरने 1 गुणासह पॉइंट्स टेबलमधील आपलं अव्वल स्थान भक्कम केलं. तर हैदराबादने रविवारी डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात पंजाबवर विजय मिळवला. पंजाबने या विजयासह राजस्थानला पछाडत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्यानंतर राजस्थानला एलिमिनेटर खेळायचं टाळण्यासाठी केकेआर विरुद्ध विजय मिळवणं बंधनकारक होतं. मात्र पावसाने सर्व खेळखंडोबा केला. तर पॉइंट्स टेबलमध्ये केकेआर पहिल्या स्थानी विराजमान होतीच. केकेआरने 1 गुणासह आपलं स्थान आणखी भक्कम केलं. तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी अनुक्रमे हैदराबाद, राजस्थान आणि आरसीबी हे 3 संघ आहेत.
शेवटच्या सामन्यानंतर टॉप 4 मधील स्थान निश्चित
After 7️⃣0️⃣ matches of hard-fought cricket, a final look at the #TATAIPL 2024 Points Table 🙌
Did your favourite team qualify for the Playoffs? 🤔 pic.twitter.com/s3syDvL6KH
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2024
केकेआर-एसआरएच, क्वालिफायर-1, 21 मे, अहमदाबाद.
आरसीबी विरुद्ध आरआर, एलिमिनेटर, 22 मे, अहमदाबाद.
क्वालिफायर 1 पराभूत vs एलिमिनेटर विजेता, क्वालिफायर 2, 24 मे, चेन्नई.
क्वालिफायर 1 विजेता- क्वालिफायर 2 विजेता, फायनल, 26 मे, चेन्नई.
दरम्यान आता राजस्थानला एलिमिनेटरमध्ये आरसीबी विरुद्ध खेळावं लागणार आहे. तर प्लेऑफ 1 सामना हा केकेआर विरुद्ध हैदराबाद यांच्यात होणार आहे. तसेच क्वालिफायर 2 सामना हा प्लेऑफ 1 मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटर विजेता संघ यांच्यात होईल.