आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक संघ आहे. राजस्थान रॉयल्सने या स्पर्धेतील साखळी फेरीत चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत राजस्थानने चार सामने गमावले आहेत. मात्र या सामन्यातील पराभवही निसटता आहे. त्यामुळे राजस्थान संघ जेतेपद मिळवू शकतो असं चाहत्यांना वाटत आहे. आता साखळी फेरीत राजस्थानचे दोन सामने शिल्लक आहेत. त्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफचा मार्ग मोकळा होईल. पण असं सर्व चांगलं होत असताना राजस्थानला धक्का बसला आहे. राजस्थानचा सलामीचा फलंदाज जोस बटलरमुळे संघाला मोठा फटका बसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जोस बटलर आयपीएलमधील उर्वरित सामने खेळणार नाही. लवकरच पाकिस्तान इंग्लंड यांच्यात चार सामन्याची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेत खेळण्यासाठी जोस बटलरने आपलं नाव मागे घेतलं आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 22 मेपासून 30 मे पर्यंत चार टी20 सामन्याची मालिका खेळणार आहे. त्यानंतर टी20 वर्ल्डकप होणार आहे. यात जोस बटलर कर्णधारपद भूषविताना दिसणार आहे.
राजस्थान रॉयल्स फ्रेंचायसीने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात जोस बटलर हॉटेल बाहेर जाताना दिसत आहे. त्याने आपल्या संघ सहकाऱ्यांची गळाभेट घेतली आणि गाडीत बसला. यावेळी त्याने राजस्थान रॉयल्स जेतेपद जिंकावं अशा शुभेच्छा दिल्या. बटलरचा हा व्हि़डीओ राजस्थानच्या चाहत्यांना भावुक करणारा आहे. कारण बॅकग्राउंडला ‘मैनु विदा करो’ गाणं वाजत आहे. कॅप्शनमध्ये जोस भावाची खूप आठवण येईल असं लिहिलं आहे.
We’ll miss you, Jos bhai! 🥺💗 pic.twitter.com/gnnbFgA0o8
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 13, 2024
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा केली आहे. यात मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, विल जॅक्स, फिल सॉल्ट आणि रीस टोपली यांची नावे आहेत. त्यामुळे हे खेळाडूही परततील. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि आरसीबीला फटका बसेल. आरसीबीचं प्लेऑफचं गणित बसत असताना विल जॅक्सचं जाणं महागात पडू शकते. दुसरीकडे, कोलकात्यासाठी सॉल्टही चांगली कामगिरी करत आहे. तर मोईन अली चेन्नई सुपर किंग्स अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या जाण्यानं फटका बसू शकतो.