टी20 वर्ल्डकप संघातून डावलल्यानंतर रियान परागची पहिली प्रतिक्रिया, संजू सॅमसनबाबतही म्हणाला की…

| Updated on: May 03, 2024 | 4:08 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सच्या रियान परागची बॅट चांगलीच तळपली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यात 159.14 स्ट्राईक रेटने 409 धावा केल्या आहेत. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही रियानचं नाव आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातही रियाने चांगली फलंदाजी केली. मात्र सामना एका धावेने गमावला. असं असताना सामन्यानंतर त्याला टी20 वर्ल्डकप संघातून डावलल्याबाबत विचारलं गेलं.

टी20 वर्ल्डकप संघातून डावलल्यानंतर रियान परागची पहिली प्रतिक्रिया, संजू सॅमसनबाबतही म्हणाला की...
Image Credit source: PTI
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. काही जणांना संधी, तर काही जणांच्या पदरी निराशा पडली आहे. टी20 वर्ल्डकपसाठी 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा होण्यापूर्वी बरीच नावं चर्चेत होती. मात्र संघाची घोषणा होताच चर्चेतील सर्व नावांवर पडदा पडला आहे. यात एक नाव चर्चेत होतं ते म्हणजे रियान परागचं..रियान पराग राजस्थान रॉयल्सकडून खेळत असून चांगली कामगिरी करत आहे. त्याने आपल्या फलंदाजीने विरोधकांची तोंडं बंद केली आहेत. त्यामुळे त्याची निवड व्हावी अशी अनेकांची इच्छा होती. मात्र निवड समितीने बऱ्याच निकषानंतर खेळाडूंची निवड केली आहे. या संघातून रियान परागलाही डावलण्यात आलं आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात रियान परागने 49 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. मात्र हा सामना राजस्थानला फक्त एका धावेने गमवावा लागला. यानंतर रियान परागला अनेक प्रश्न विचारले गेले. यत टी20 वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्याबाबतही विचारण्यात आलं होतं.

रियान परागने सांगितलं की, “टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात स्थान न मिळाल्याचं काहीही दु:ख नाही. मागच्या वर्षी आयपीएमध्ये खेळण्याच्या रेसमध्येही नव्हतो. मी अनेक अफवा ऐकल्या. त्यानंतर मी सोशल मीडियापासून दूर गेलो. आता मी स्वत:बाबत सोशल मीडियावर ऐकतो वाचतो तेव्हा आनंद होतो. आता चांगल्या गोष्टीसाठी लोकं माझी आठवण काढत आहेत. मी आजही कोणत्याही गोष्टींबाबत विचार करत नाही.”

रियान परागचं पूर्ण लक्ष्य हे आता आयपीएलवर आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सला जेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. इतकंच काय तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनची टीम इंडियात निवड झाली आहे. त्यावरही रियान परागने प्रतिक्रिया दिली. “संजू सॅमसनला संघात निवडल्याबद्दल आनंदी आहे. हे टीम इंडियासाठी चांगलं आहे. आम्हाला आशा आहे की. यावर्षी आम्ही वर्ल्डकप घरी आणू.” रियान परागने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यात 159.14 च्या स्ट्राईक रेटने 409 धावा केल्या आहेत. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप 5 खेळाडूंमध्ये आहे.