मुंबई : आयपीएल 2024 मधील चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना होत असून राजस्थान रॉयल्स संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. के. एल. राहुल लखनऊचं तर संजू सॅमसन राजस्थानचं नेतृत्त्व करत आहे. दोन्ही संघांचा हा पहिला सामना असून विजयाचा श्रीगणेशा कोणता संघ करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
आम्ही दोन्हीसाठी तयार होतो. मात्र विकेट बॅटींगसाठी चांगलं असल्याने आम्ही प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रियान पराग मिडल ऑर्डरला खेळताना दिसेल, जयपूरला परत आल्याने ड्रेसिंग रूममध्ये सकारात्मक वातावरण असल्याचं संजू सॅमसन म्हणाला.
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): के.एल. राहुल (C), क्विंटन डी कॉक (W), देवदत्त पडिककल, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर
दीपक हुडा, मयंक यादव, अमित मिश्रा, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौतम
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल
सबस्टिट्युट प्लेअर नांद्रे बर्गर, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, शुभम दुबे, कुलदीप सेन
GAME SET 💪
Folks, who are you backing today – #𝐑𝐑 or #𝐋𝐒𝐆 🤔#TATAIPL | #RRvLSG pic.twitter.com/cKqiCwdDMa
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2024
आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात 3 लढती झाल्या आहेत, ज्यामध्ये राजस्थानच्या संघाने 2 वेळा विजय मिळवला आहे, तर लखनऊ संघाला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.