आयपीएल 2024 स्पर्धेच्या सुरुवातीला आरसीबीला जेतेपदासाठी दावेदार मानलं जात होतं. मात्र स्पर्धेतील सुरुवात पाहून प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आरसीबीने जोरदार कमबॅक केलं. सलग सहा सामन्यात करो या मरोची लढाई पार करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. पण एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या सामन्यात आरसीबीची फलंदाजी हवी तशी झाली नाही. आरसीबीचं रन गाडं 172 धावांवर आडलं आणि विजयासाठी फक्त 173 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान आरसीबीने 19व्या षटकात पूर्ण केलं. मात्र या सामन्यानंतर ग्लेन मॅक्सवेलच्या कामगिरीचं ऑडिट होत आहे. निराश झालेल्या चाहत्यांनी ग्लेन मॅक्सवेलला धारेवर धरलं आहे. महत्त्वाच्या सामन्यात केलेली चूक आरसीबीला किती महागात पडली याचा लेखाजोखा मांडला आहे. आयपीएल स्पर्धेत आरसीबीकडून सर्वात सुमार कामगिरी करणारा फलंदाज म्हणून ग्लेन मॅक्सवेलचं नाव पुढे आलं आहे. सामन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचा हा फॉर्म कायम राहिला.
मोठी धावसंख्या उभारण्याची गरज असताना पहिल्याच चेंडूवर बाद होत तंबूत परतला. इतकंच काय तर राजस्थानवर दबाव टाकण्यासाठी विकेट महत्त्वाच्या असताना प्लेऑफच्या पाचव्या षटकात एक सोप झेल सोडला. टॉम कोहलरचा झेल पकडला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं. राजस्थानवर दडपण आणण्यास मदत झाली असती. त्यामुळे मॅक्सवेल फलंदाजीसोबत क्षेत्ररक्षणातही अपयशी ठरला. एकूण आयपीएलचा विचार करता मॅक्सवेलचं योगदान फक्त 52 धावांचं होतं. म्हणजेच 10 सामन्यात फलंदाजी करणाऱ्या मॅक्सवेलने 5.78 च्या सरासरीने 52 धावा केल्या. या पर्वात तो पाचवेळा शून्यावर बाद झाला.
आरसीबी फ्रेंचायसी मॅक्सवेलसाठी एका पर्वात 11 कोटी रुपये मोजते. म्हणजेच 52 धावा करणाऱ्या मॅक्सवेलला प्रति रन्स 21 लाख रुपये मिळाले. ग्लेन मॅक्सवेळ 10 सामन्यात एकूण 6 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला. म्हणजेच ग्लेन मॅक्सवेलचा आरसीबीला काहीच उपयोग झाला नाही. उलट मॅक्सवेलच्या कामगिरीमुळे आरसीबीवर मोक्याच्या क्षणी दडपण वाढलं. त्यामुळे पुढच्या मेगा लिलावात मॅक्सवेलला रिलीज करण्याची चर्चा रंगली आहे. आता फ्रेंचायसी काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे.