IPL 2024 आधी मोठी बातमी, आरसीबी संघाचं बदललं नाव, नव्या जर्सीत विजेतेपदाचं स्वप्न!

| Updated on: Mar 19, 2024 | 9:50 PM

RCB Team New Name : आयपीएल स्पर्धेला तीन दिवस बाकी असताना आरसीबी संघाने मोठा निर्णय घेतला आहे. टीमच्या नावामध्ये बदल केलागेला आहे. हा बदल नेमका काय आहे आणि कशावरून गेला आहे जाणून घ्या.

IPL 2024 आधी मोठी बातमी, आरसीबी संघाचं बदललं नाव, नव्या जर्सीत विजेतेपदाचं स्वप्न!
RCB Team New Name IPl 2024
Follow us on

मुंबई :  आयपीएल 2024 च्या थराराला सुरुवात होण्यासाठी तीन दिवस बाकी असताना आरसीबी संघाने मोठा निर्णय घेतला आहे. यंदा आरसीबी संघ नव्या जर्सीमध्ये दिसणार असून आता संघाच्या नावातही बदल केला गेला आहे. वुमन्स प्रीमियल लीगमधील आरसीबीने संघाने विजेतेपद जिंकल्यावर फ्रँचायसीने हा निर्णय घेतला आहे. आरसीबी संघाचं नवीन नाव काय आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. नावात काय बदल केला गेला आहे? तो बदल काय आहे जाणून घ्या.

आरसीबी संघाचं नवीन नाव:-

आरसीबी संघांच नवीन नाव हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असं करण्यात आलं आहे. सुरूवातीला नेमका काय बदल केला हो कोणाच्या लक्षात नाही आलं. आरसीबी संघाच्या नावातील बंगलोरच्या ऐवजी आता बंगळुरू केलं आहे. 2014 मध्ये बंगलोर शहराच नाव बदलून बंगळुरू असं करण्यात आलं होतं. मात्र तेव्हा आरसीबीने आपल्या नावात कोणताही बदल केला नव्हता. मात्र आता दहा वर्षांनी आरसीबीनेही नावामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरसीबी संघाने जर्सीमध्येही बदल केला आहे, त्यामुळे नावात आणि जर्सीमध्ये बदल करत आरसीबी संघ कात टाकण्याचा प्रयत्न असणार आहे. आरसीबीला आयपीएलमध्ये एकही विजेतेपद  जिंकता आलेलं नाही. टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू आत-बाहेर झाले, कॅप्टन बदलला पण अजुनही काही यश आलं नाही. मात्र यंदा वुमन्स टीमने विजेतेद जिंकल्याने चाहत्यांना आता मेन्स टीमकडूनही विजेतेपदाच्या आशा आहेत. या हंगामामध्ये संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामामध्ये आरसीबी आणि सीएसकेमध्ये पहिला सामना होणार आहे. या सामन्यात कोणता संघा विजयाचा श्रीगणेशा करतो हे पाहावं लागणार आहे.

आरसीबी संघाची नवीन जर्सी:-

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल फायनल संंघ 2024 फाफ डु प्लेसिस(C), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार विशक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, हिमन्स, मोहम्मद सिराज. शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.