महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 16 व्या मोसमातील अंतिम सामन्यात शेवटच्या बॉलवर विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं. धोनीने आपल्या नेतृत्वात चेन्नईला पाचव्यांदा चॅम्पिनय केलं. मात्र 17 व्या मोसमात चेन्नई ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात प्लेऑफमध्ये पोहचण्यात अपयशी ठरली. आरसीबी विरुद्धच्या निर्णायक सामन्यात चेन्नईला पराभूत व्हावं लागलं. आरसीबीने चेन्नईवर 27 धावांनी विजय मिळवत प्लेऑफमध्ये धडक मारली. चेन्नईचं या पराभवासह या हंगामातील आव्हान संपुष्टात आलं.
महेंद्रसिंह धोनीने रवींद्र जडेजाच्या मदतीने चेन्नईला विजयापर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न केले. मात्र तसं शक्य झालं नाही. धोनी आऊट झाला आणि चेन्नईचा पराभव निश्चित झाला. चेन्नईच्या या अशा शेवटानंतर आता महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार असल्याची चर्चा रंगली आहे. या हंगामाच्या सुरुवातीपासूनच धोनीच्या निवृत्तीबाबत अनेक चर्चा रंगल्या.
महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती जाहीर करण्याची काही कारणंही असल्याचं म्हटलं जात आहे. धोनीला या हंगामाच्या सुरुवातीपासूनच गुडघ्याचा त्रास आहे. धोनी या त्रासामुळेच वरच्या क्रमांकावर बॅटिंगला आला नाही. धोनीला धावतानाही त्रास जाणवतो. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि माजी सहकारी सुरेश रैना या दोघांनीही धोनी आणखी एक हंगाम खेळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
धोनीसाठी खास व्हीडिओ
𝗜𝗣𝗟 𝟮𝟬𝟮𝟰 💛
Vibe MSD 😇
A feeling that captured the emotions of millions across the nation 🥹#TATAIPL | #RCBvCSK | @ChennaiIPL | @msdhoni pic.twitter.com/CyCD05qhKH
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2024
तसेच धोनीने गेल्या हंगामात हा माझा कारकीर्दीतील अखेरचा टप्पा असल्याचं म्हटलं होतं. कोरोनानंतर धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियममध्ये एकच गर्दी केली होती. तेव्हा धोनीने चाहत्यांचे आभार मानले होते. तसेच केकेआर विरुद्धच्या सामन्यानंतरही धोनीने चाहत्यांचे सपोर्टसाठी आभार मानले होते. तसेच हे चाहते पुढच्या वेळेस केकेआरच्या जर्सीत येतील. त्यांनी मला निरोप दिला आहे, असं धोनीने म्हटलं होतं.
दरम्यान महेंद्रसिंह धोनी याने आयपीएलमध्ये 264 सामन्यांमधील 229 डावांमध्ये 137.54 स्ट्राईक रेट आणि 39.13 च्या सरासरीने 5 हजार 243 धावा केल्या आहेत. महेंद्रसिंह धोनीने या दरम्यान 24 अर्धशतकं 363 चौकार आणि 252 षटकार ठोकले आहेत.