IPL 2024 RCB vs CSK : चेन्नई सुपर किंग्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, आरसीबीला 18 धावांनी सामना जिंकावा लागणार

| Updated on: May 18, 2024 | 7:12 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील प्लेऑफसाठीचा महत्त्वाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. तसेच आरसीबीला या सामन्यात विजयासह नेट रनरेटही चांगला ठेवावा लागणार आहे. त्यामुळे या सामन्याबाबत उत्सुकता आहे.

IPL 2024 RCB vs CSK : चेन्नई सुपर किंग्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, आरसीबीला 18 धावांनी सामना जिंकावा लागणार
Image Credit source: IPL/BCCI
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेतील 68 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्याची रंगत वाढली आहे.  हे संघ स्पर्धेत दुसऱ्या एकमेकांना सामोरे जात आहे. या दोन संघांच्या सामन्याने स्पर्धेची सुरुवात झाली होती. तेव्हा चेन्नई सुपर किंग्सने हा सामना जिंकला होता. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 173 धावा केल्या होत्या. तर हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने 18.4 षटकात पूर्ण केलं होतं. चेन्नई सुपर किंग्सने आरसीबीला पहिल्या सामन्यात 6 विकेट्स आणि 8 चेंडू राखून पराभूत केलं होतं. पण आता स्थिती वेगळी असून करो या मरोची लढाई आहे. त्यामुळे सामन्यात प्रत्येक खेळाडू आपला जीव ओवाळून टाकणार यात शंका नाही. दरम्यान पावसाचं सावट असल्याने नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा होता. नाणेफेकीचा कौल चेन्नई सुपर किंग्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य दिलं आहे. आरसीबीने हा सामना 18 धावांनी जिंकला तर प्लेऑफचं तिकीट पक्कं होईल.

नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ऋतुराज गायकवाड म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. विकेट चांगली दिसत आहे, परिस्थिती ढगाळ आहे आणि आम्ही पहिल्या 2-3 षटकांमध्ये जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करू. आयपीएलमधील प्रत्येक खेळ जिंकलाच पाहिजे. संघात एक बदल असून मोईन उपलब्ध नाही आणि सॅन्टनर त्याची जागा घेईल.” रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने सांगितलं की, “आम्हीही क्षेत्ररक्षण केले असते, पण आम्ही शेवटची फलंदाजी करताना चांगली धावसंख्या उभारली. नाणेफेक गमावणे चांगलं नाही,परंतु आम्ही शेवटच्या 5 सामन्यांमधून खूप आत्मविश्वास घेऊन आलो आहेत . सेट-अप छान आहे, बाद फेरीपूर्वीचा शेवटचा सामना आहे, परिस्थिती छान तयार केली आहे आणि आमचा शेवटचा लीग गेम आमच्या चाहत्यांसमोर खेळताना आम्हाला आनंद होत आहे. जास्त विचार करत नाही, जसे येईल तसे आम्ही ते घेऊ आणि आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थीक्षाना.