आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 68 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करणार आहेत. तर फाफ डु प्लेसीस याच्या खांद्यावर आरसीबीची धुरा असणार आहे. उभयसंघाची या हंगामात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. याआधी उभयसंघांमध्ये 22 मार्च रोजी सलामीचा सामना झाला होता. त्या सामन्यात चेन्नईने आरसीबीवर 6 विकेट्सने विजय मिळवला होता. आता या सामन्यात आरसीबीला विजय मिळवून मागील पराभवाचा वचपा घेण्यासह प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. मात्र आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी ठराविक विकेट्सने/धावांनी विजय मिळवण्याची अट आहे. तर दुसऱ्या बाजूला चेन्नई विजयासह प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्यामुळे या सामन्यात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स पॉइंट्स टेबलमध्ये ताज्या आकडेवारीनुसार 13 सामन्यांमधील 7 विजयासह चौथ्या स्थानी आहे. तर आरसीबीने 13 पैकी 6 सामने जिंकले आहेत. आरसीबीच्या खात्यात 12 पॉइंट्स आहेत. चेन्नईच्या तुलनेत आरसीबाचा एक विजय कमी आहे. त्यामुळे आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी हा सामना चांगल्या फरकाने जिंकावा लागणार आहे. या सामन्याबाबत आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
आरसीबी विरुद्ध चेन्नई सामना शनिवारी 18 मे रोजी होणार आहे.
आरसीबी विरुद्ध चेन्नई सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
आरसीबी विरुद्ध चेन्नई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
आरसीबी विरुद्ध चेन्नई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
आरसीबी विरुद्ध चेन्नई सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, दिनेश कार्तिक, सौरव चौहान, रजत पाटीदार, अनुज रावत, यश दयाल, विजयकुमार वैशाख, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, कॅमरन ग्रीन, मनोज भंडागे आणि आकाश दीप.
चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), एमएस धोनी, अरावेली अवनीश, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जाधव मंडल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, दीपकुमार सिंधू, निशांत सिंधू, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, शार्दूल ठाकुर, महेश तीक्षना आणि समीर रिझवी.