RCB vs CSK : फाफ डु प्लेसिसला बाद दिल्यानंतर वादाची फोडणी! सोशल मीडियावर रंगली चर्चा, व्हिडीओ पाहून तु्म्हीच ठरवा

| Updated on: May 18, 2024 | 10:35 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफसाठी महत्त्वाचा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत चेन्नई सुपर किंग्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 5 गडी गमवून 218 धावा केल्या आणि विजयासाठी 219 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यातील फाफ डु प्लेसिसचा रनआऊट वादाचा विषय ठरला आहे.

RCB vs CSK : फाफ डु प्लेसिसला बाद दिल्यानंतर वादाची फोडणी! सोशल मीडियावर रंगली चर्चा, व्हिडीओ पाहून तु्म्हीच ठरवा
Image Credit source: Twitter
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेतील महत्त्वाचा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी खूपच महत्त्वाचा होता. प्रत्येक धावा संघासाठी महत्त्वाची होती. त्यामुळे विकेट वाचवून मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान होतं. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 78 धावांची भागीदारी केली. विराट कोहली 29 चेंडूत 47 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे डाव पुढे नेण्याची जबाबदारी फाफ डु प्लेसिसवर आली होती. त्याला रजत पाटीदारची उत्तम साथही लाभत होती. आधीचा धावांचा डोंगर उभा राहात असल्याने कर्णधार ऋतुराज गायकवाडने 13वं षटक सँटनरच्या हाती सोपवलं. चेंडू वळत असल्याने धावांची गती कमी होईल तसेच विकेट मिळेल ही अपेक्षा होती. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर स्ट्राईकला रजत पाटीदार उभा होता. त्याने सँटनरचा चेंडू जोरात समोर मारला. हा चेंडू सँटनरच्या हाताला लागला आणि थेट यष्टीवर आदळला. नॉन स्ट्राईकला असलेल्या फाफने क्रिझ सोडलं होतं. त्यामुळे जोरदार अपील करण्यात आलं. मैदानातील पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला.

तिसऱ्या पंचांना सर्वप्रथम सँटनरच्या हाताला चेंडू लागला की नाही हे तपासलं. त्यानंतर फाफ क्रिझमध्ये होता की नाही ते दोन तीन वेळा पाहिल. त्यानंतर फाफ डु प्लेसिस क्रिझमध्ये बॅट टेकवताना आणि चेंडू यष्टीवर आदळताना किती फरक आहे हे तपासलं. त्यानंतर फाफ डु प्लेसिस धावचीत असल्याचं तिसऱ्या पंचांनी घोषित केलं. त्यामुळे फाफ डु प्लेसिसचा डाव दुर्दैवाना 54 धावांवर आटोपला. त्याने 39 चेंडूत 54 धावा केल्या. याता 3 चौकार आणि तीन षटकार मारले. मात्र या विकेटनंतर सोशल मीडियावर भलतीच चर्चा रंगली आहे. फाफ आऊट होता की नाही यावरून वादाला फोडणी मिळाली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थीक्षाना.