आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 68 व्या सामन्यात अखेर ज्याची भीती होती, तेच झालं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यात पावसाची एन्ट्री झाल्याने खेळ थांबवण्यात आला आहे. सामन्याला 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली. त्यानंतर 15 मिनिटांनी एम चिन्नास्वामी स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. आरसीबीच्या विराट कोहली आणि कॅप्टन फाफ डु प्लेसीस या सलामी जोडीने तडाखेदार सुरुवात करुन दिली. या दोघांच्या तुफान बॅटिंगनंतर पावसाने आपल्या मुसळधार बॅटिंगला सुरुवात केली आणि सामना थांबवण्यात यश मिळवलं. पावसाची एन्ट्री होताच आरसीबीचे दोन्ही फलंदाज आणि सीएसकेची टीम मैदानाबाहेर गेली. तर ग्राउंड्समॅन टीमने फटाफट खेळपट्टी आणि महत्त्वाचा भाग कव्हर्सने झाकला. आता क्रिकेट चाहते सामना पुन्हा सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
चेन्नईने टॉस जिंकून आरसीबाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीकडून फाफ आणि विराट ही जोडी बॅटिंगसाठी मैदानात आली. या सलामी जोडीने पहिल्या 3 ओव्हरमध्ये 10.33 च्या रनरेटने बिनबाद 31 धावा जोडल्या. फाफ डु प्लेसीसने 9 बॉलमध्ये नाबाद 12 धावा केल्या. तर विराट 9 बॉलमध्ये 19 धावा करुन खेळत होता. इतक्यात पावसाने आपली एन्ट्री घेतली. पाऊस आल्याने आरसीबीचे दोन्ही फलंदाज हे ड्रेसिंग रुममध्ये गेले. काही मिनिटं मुसळधार झाल्यानंतर रिपरिप सुरु झाली आणि अखेर पाऊस आऊट झाला. त्यानंतर विराट आणि फाफ दोघेही निघून डगआऊटमध्ये आले. आता क्रिकेट चाहते आणि दोन्ही संघ हे सामना सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
ग्राउंड स्टाफकडून पाऊस थांबल्यानंतर मैदान कोरडं करण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. तसेच मैदानात जमा झालेलं पाणी शक्य तितक्या वेगाने हटवण्याचे काम केलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला संबंधित टीम ही मैदानात जाऊन पाहणी केली. आता सामना कधी एकदाचा सुरु होतोय, याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.
मोठी अपडेट
MATCH RE-START AT 8.25 PM IST..!!!
– No overs lost. pic.twitter.com/RfUijOd96e
— Johns. (@CricCrazyJohns) May 18, 2024
दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी काही मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर गूड न्यूज समोर आली आहे. सामन्याला अखेर 8 वाजून 25 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. पावसामुळे जवळपास 40 मिनिटांचा वेळ वाया गेला. मात्र त्यानंतरही ओव्हर कापण्यात आलेल्या नाहीत.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद सिराज.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग आणि महेश तीक्षना.