आयपीएल 2024 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिमाखदारपणे एन्ट्री मारली आहे. सलग सहा सामने जिंकत आरसीबीने भल्याभल्यांना पराभवाचं पाणी पाजलं. एकीकडे चेन्नईचं प्लेऑफचं गणित सोपं असताना अवघड प्रश्न मात्र आरसीबीने सोडवला. नाणेफेकीचा कौल जिंकून चेन्नई सुपरि किंग्सने आरसीबीला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 218 धावा केल्या आणि विजयासाठी 219 धावांचं आव्हान दिलं. खरं तर प्लेऑफचं आव्हान हे 200 धावांचं होतं. त्यामुळे काहीही करून चेन्नई सुपर किंग्सला 20 षटकात 200 धावांवर रोखायचं होतं. पण रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनीची जोडी जमल्यानंतर हे गणित सहज सुटेल असं वाटत होतं. शेवटच्या षटकात 17 धावांची आवश्यकता होती आणि फाफने हे षटक यश दयालच्या हाती सोपवलं. तोच दयाल ज्याला मागच्या पर्वात रिंकू सिंहने शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारत सामना जिंकला होता. गुजरात टायटन्सने त्याला मिनी लिलावात रिलीज केलं. पण आरसीबीने त्याच्यावर विश्वास दाखवला. इतकं करूनही त्याच्या कचरा म्हणून टिपणी केली गेली. मात्र यात यश दयाल खचला नाही, फ्रेंचायसीनेही त्याला तशीच साथ दिली. यशने महत्त्वाच्या सामन्यात शेवटचं षटक जबरदस्त टाकत संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवलं. यश दयालने एकूण चार षटकं टाकली त्यात 42 धावा देत 2 गडी बाद केले. खरं तर यश दयाल हा लगानमधील ‘कचरा’ ठरला आहे.
यश दयालच्या हाती चेंडू सोपवल्यानंतर पहिल्याच फुल टॉस चेंडूवर महेंद्रसिंह धोनी षटकार मारला. त्यामुळे 5 बॉल 11 असं समीकरण आलं. सामना जिंकला तर प्लेऑफचं गणित सुटणार नाही असंच यावेळी वाटत होतं. मात्र यश दयालने दुसऱ्याच चेंडूवर महेंद्रसिंह धोनीला तंबूत पाठवलं. तिसऱ्या चेंडूसाठी स्ट्राईकला आलेल्या शार्दुल ठाकुरला निर्धाव चेंडू टाकला. चौथ्या चेंडूवर एक धाव घेण्यात शार्दुल यशस्वी ठरला. त्यामुळे 2 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण आलं. आयपीएलमध्ये कायम चमकदार कामगिरी करणाऱ्या रवींद्र जडेजासाठी हे सोपं आव्हान होतं. पण त्याला एकही धाव घेता आली नाही. दोन्ही चेंडू यश दयालने निर्धाव ठाकले. सामना 27 धावांनी जिंकला असला तरी खरा विजय हा 9 धावांनी झाला असंच म्हणावं लागेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थीक्षाना.