दिल्ली कॅपिट्ल्सला नियमित कर्णधार ऋषभ पंत याच्या अनुपस्थितीत आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 62 व्या आणि करो या मरो सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. दिल्लीचं या पराभवामुळे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात तर आलं नाही. मात्र आता दिल्लीला प्लेऑफची संधी नाहीच्या बरोबर आहे. आरसीबीने दिल्लीवर 47 धावांनी विजय मिळवला. दिल्लीला आरसीबीने विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र आरसीबीला धड 20 ओव्हरही खेळता आलं नाही. दिल्लीचा डाव 140 धावांवर 19.1 ओव्हरमध्ये आटोपला.
आरसीबी विरुद्ध दिल्ली सामन्यात उभयसंघातील फिल्डिंगमध्ये प्रचंड विरोधाभास पाहायला मिळाला. दिल्लीने फिल्डिंग दरम्यान अनेक कॅच ड्रॉप केल्या. तसेच अतिरिक्त धावा लुटवल्या. तर उलटपक्षी आरसीबीने कडक फिल्डिंग केली. आरसीबीने 2 रन आऊट केले. जॅक फ्रेझर मॅकग्रुक नॉन स्ट्राईक एंडवर दुर्देवीरित्या रन आऊट झाला. तसेच आरसीबीने अप्रतिम फिल्डिंग करत दिल्लीला बॅकफुटवर ढकललं. त्यामुळे दिल्लीला कमबॅक करता आलं नाही. दिल्लीच्या विजयासाठी कॅप्टन अक्षर पटेल याने एकाकी झुंज दिली. त्याने 57 धावा करत झुंज दिली, पण त्याचे एकट्याचे प्रयत्न दिल्लीच्या विजयासाठी पुरेसे ठरले नाहीत. असंख्य चुका आणि पराभवानंतर अक्षर पटेलने काय म्हटलं? जाणून घेऊयात.
कॅच सोडणं आम्हाला महागात पडलं. कॅच सोडल्या नसत्या तर 150 पर्यंत आव्हान मिळालं असतं. मात्र तसंच झालं नाही. 180 धावांचा पाठलाग करताना झटपट 4 विकेट्स गमावल्या. त्यात 2 मुख्य फलंदाज रन आऊट झाले. अशात 180 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करणं सोपं नाही, असं अक्षर पटेल सामन्यानंतर म्हणाला.
दुर्देवी रनआऊट
ICYMI‼️
Yash Dayal’s reflexes were on point 👌
Jake Fraser-McGurk went back just when he was getting a move on!
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #RCBvDC | @RCBTweets pic.twitter.com/UQxck6UDLt
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2024
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेईंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : अक्षर पटेल (कॅप्टन), जेक फ्रेझर-मॅकगुर्क, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), शाई होप, कुमार कुशाग्रा, ट्रिस्टन स्टब्स, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.