आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 62 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने करो या मरो सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्ससमोर विजयासाठी 188 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आरसीबीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 187 धावा केल्या. आरसीबीसाठी रजत पाटीदार याने सर्वाधिक धावा केल्या. रजतने टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत झंझावाती अर्धशतक ठोकलं. तर विल जॅक्स, कॅमरुन ग्रीन आणि विराट कोहली या त्रिकुटाने निर्णायक खेळी केली. त्यामुळे आरसीबीला 180 पार मजल मारता आली. आता दिल्ली या विजयी आव्हानाचा कशाप्रकारे पाठलाग करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
रजत पाटीदार याने आरसीबीसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. रजतने 32 बॉलमध्ये 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 162.50 च्या स्ट्राईक रेटने 52 धावांची खेळी केली. विल जॅक्सने 29 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्स ठोकून 41 रन्स केल्या. कॅमरुन ग्रीन याने 24 बॉलमध्ये 32 धावांची नाबाद खेळी केली. ओपनिंगला आलेल्या विराट कोहलीने 13 बॉलमध्ये 27 रन्स केल्या. तर महिपाल लोमरुरने 12 धावांचं योगदान दिलं. कर्ण शर्मा 6 रन्स करुन माघारी परतला. तर तिघांना भोपळाही फोडता आला नाही.
विल जॅक्स आणि रजत पाटीदार या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. त्यामुळे आरसीबीने चांगली पकड मिळवली होती. मात्र ही जोडी आऊट झाल्यानंतर दिल्लीने शानदार कमबॅक केलं. दिल्लीने आरसीबीला ठराविक अंतराने झटके दिले. दिल्लीने अशाप्रकारे आरसीबीला डेथ ओव्हरमध्ये फटकेबाजी करण्यापासून रोखण्यात यश मिळवलं. दिल्लीकडून खलील अहमद आणि रसीख सलाम या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर ईशांत शर्मा, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
कोण जिंकणार सामना?
Innings Break!
A solid 3️⃣rd wicket partnership help #RCB set a 🎯 of 1️⃣8️⃣8️⃣
With 2️⃣ crucial points up for grabs, which way is this one going? 🤔
Scorecard ▶️ https://t.co/AFDOfgLefa#TATAIPL | #RCBvDC pic.twitter.com/g24jQoXjKD
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2024
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेईंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : अक्षर पटेल (कॅप्टन), जेक फ्रेझर-मॅकगुर्क, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), शाई होप, कुमार कुशाग्रा, ट्रिस्टन स्टब्स, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.