आयपीएल 2024 मधील 15 वा सामना असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. आरसीबी संघाने टॉस जिंकत लखनऊला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. लखनऊ संघाने 20 ओव्हरमध्ये 181-5 धावा केल्या आहेत. लखनऊ संघाकडून ओपनर क्विंटन डी कॉकने 56 बॉलमध्ये 81 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. शेवटला फलंदाजीसाठी आलेल्यान निकोलस पूरन याने आक्रमक खेळी करत संघाची धावसंख्या 180 पार नेली. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेल याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
लखनऊ संघाकडून सलामीला आलेल्या क्विंटन डी कॉक आणि के.एल. राहुल आले होते. दोघांनीही संघाला आक्रमक सुरूवात करून दिली होती. राहुल मोठा फटका मारण्याच्या नादात 20 धावांवर आऊट झाला. लखनऊच्या मिडल ऑर्डरवर आरसीबीच्य गोलंदाजांना अंकुश ठेवण्याचं काम केलं. पड्डीकल 6 धावा, स्टॉयनिसने चांगली सुरूवात केली मात्र तो मॅक्सवेलच्या जाळ्यात अडकला. 15 बॉलमध्ये 24 धावांची आक्रमख खेळी मात्र मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यानंतर आलेल्या निकोलस पूरन याने टॉप गिअरमध्ये धडाकेबाज बॅटींग केली.
21 बॉलमध्ये 5 सिक्सर आणि 1 चौकार मारत नाबाद 40धावा करत आरसीबीच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. पूरन याने टॉपलीच्या एका ओव्हरमध्ये सलग तीन षटकार मारत आरसीबीला शेवटच्या ओव्हर्समध्ये बॅकफूटला ढकललं.
विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (C), कैमरून ग्रीन, ग्लेन मैक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (WK), रीस टॉपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेवन): क्विंटन डी कॉक (WK), केएल राहुल (C), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, रवि बिश्नोई, यश ठाकुर, नवीन-उल-हक, मयंक यादव