आयपीएल स्पर्धेत सर्वात कठीण भाग कोणता असावा तर तो गोलंदाजी..टी20 फॉर्मेटमध्ये गोलंदाजांच करिअर पणाला लागलेलं असतं. एखाद दिवस खराब निघाला तर करिअर उद्ध्वस्त होतं. गोलंदाजाकडे मग त्याच नजरेनं पाहिलं जातं. मागच्या पर्वात गुजरात टायटन्सकडून खेळतात यश दयालने चांगली गोलंदाजी टाकली होती. मात्र शेवटच्या षटकात रिंकू सिंहने सलग पाच षटकार मारत सामना जिंकवला. हा पराभव यश दयालच्या जिव्हारी लागला होता. तसेच लिलावात गुजरातने त्याला रिलीज केलं होतं. असं एकंदरीत सर्व चित्र असताना पर्पल कॅप किती महत्त्वाची आहे यावरून लक्षात येतं. या स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना मुस्तफिझुर रहमानने 4 षटकात 29 धावा देत 4 गडी बाद केले. त्यानंतर आता आणखी पाच सामने पार पडले मात्र त्याच्या डोक्यावरील पर्पल कॅप कोणी घेऊ शकलेलं नाही. जसप्रीत बुमराह, हरप्रीत ब्रार, कगिसो रबाडा आणि टी नटराजन जवळ पोहोचले आहेत. पण त्याच्या जवळ जाण्यासाठी आणखी एका सामन्यात विकेट घ्यावी लागेल.
जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर असून त्याने गुजरात टायटन्स विरुद्ध 4 षटाकत 14 धावा देत तीन गडी बाद केले आहेत. इकोनॉमी रेट 3.50 इतका आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर हरप्रीत ब्रार असून त्याने 2 सामन्यात 7 षटकात 27 धावा देत तीन गडी बाद केले आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 3.85 इतका आहे. चौथ्या क्रमांकावर कगिसो रबाडा आहे. त्याने 2 सामन्यात 59 धावा देत 3 गडी बाद केले आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 7.37 इतका आहे. टी नटराजन पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने एका सामन्यात टाकलेल्या 4 षटकात 32 धावा देत 3 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट 8 इतका आहे.
गोलंदाज | सामने | इकॉनोमी | विकेट्स |
---|---|---|---|
मुस्तफिझुर रहमान | 3 | 8.83 | 7 |
मयंक यादव | 3 | 5.12 | 6 |
युजवेंद्र चहल | 3 | 5.50 | 6 |
मोहित शर्मा | 3 | 7.75 | 6 |
खलील अहमद | 4 | 8.18 | 6 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात अतितटीचा सामना झाला. शेवटच्या षटकात दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर यांनी विजय मिळवून दिला. असं असलं तरी हरप्रीत ब्रार याने दोन महत्त्वाचे गडी बाद केले. ग्लेन मॅक्सवेल आणि रजत पाटीदार यांना तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या सामन्यात घेतलेला एक विकेट आणि दुसऱ्या सामन्यातील 2 असे मिळून तीन गडी नावावर झाले आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र त्याला अजून मेहनत घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सला 4 गडी राखून पराभूत केलं. पंजाबने बंगळुरुसमोर विजयासाठी 177 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान बंगळुरुने 19.2 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात विराट कोहलीची खेळी महत्त्वाची ठरली. त्याने 49 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकाराच्या मदतीने 77 धावा केल्या.