IPL 2024, RCB vs PBKS : पंजाब किंग्सचं बंगळुरुसमोर विजयासाठी 177 धावांचं आव्हान

| Updated on: Mar 25, 2024 | 9:58 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स आमनेसामने आहेत. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी मैदानात दोन्ही संघात सामना सुरु आहे. या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करत 176 धावा केल्या आणि 177 विजयासाठी धावांचं आव्हान दिलं आहे.

IPL 2024, RCB vs PBKS : पंजाब किंग्सचं बंगळुरुसमोर विजयासाठी 177 धावांचं आव्हान
Follow us on

आयपीएलचा सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला. कर्णधार फाफ डु प्लेसिने कौल जिंकताच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच पंजाब किंग्सला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन यालाही प्रथम गोलंदाजी करायची होती. पण नाणेफेकीचा कौल गमवल्यानंतर वाटेला फलंदाजी आली. पंजाब किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 176धावा केल्या आणि विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पंजाब किंग्सने दिलेलं आव्हान गाठणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींसमोर पडला आहे. आव्हान सोपं वाटत असलं तरी कधी काय होईल सांगता येत नाही.

पंजाब किंग्जने 17 धावांवर पहिली विकेट गमावली. जॉनी बेअरस्टो 8 धावा करून बाद झाला.पंजाब किंग्सने पहिल्या 6 षटकांत एक विकेट गमावून 40 धावा केल्या. पंजाबने प्रभसिमरन सिंगच्या रुपाने दुसरी विकेट गमावली. त्याने 17 चेंडूत 25 धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोनच्या रुपाने तिसरा धक्का बसला. 13 चेंडूत 17 धावा करून तंबूत परतला. तर शिखर धवननेही पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलला विकेट दिली. 45 धावांची खेळी करून बाद झाला. पंजाब किंग्सने 150 धावांच्या स्कोअरवर पाचवी विकेटही गमावली आहे. सॅम करन 17 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. यश दयालने त्याला बाद केलं. तर सिराजला जितेश शर्माच्या रुपाने दुसरी विकेट मिळाली. शशांक सिंहने शेवटच्या षटकात अल्झारी जोसेफची गोलंदाजी झोडपून काढली. 2 षटकार आणि 1 चौकार मारला.

मोहम्मद सिराजने 4 षटकात 26 धावा देत 2 गडी बाद केले. यश दयालने 4 षटकात 23 धावा देत 1 गडी बाद केला. ग्लेन मॅक्सवेलने 3 षटकं टात 29 धावा देत दोन गडी बाद केले. अल्झारी जोसेफने सर्वात महागडं षटक टाकलं. त्याने 4 षटकात 43 धावा देत 1 गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर