आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. हा सामना दोन्ही संघांना महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांचं प्लेऑफचं गणित किचकट असलं तरी विजेत्या संघाच्या आशा मात्र कायम राहतील. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. पंजाब किंग्सने मागचा सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध याच मैदानात गमावला होता. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु मागचे तीन सामने जिंकून पुढे आली आहे. त्यामुळे या सामन्यात तूल्यबळ सामना पाहायला मिळणार आहे. पंजाब आणि आरसीबी या दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही जेतेपद मिळवता आलेलं नाही. दरम्यान नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. पंजाबने याच खेळपट्टीवर पुन्हा एकदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात हा निर्णय फसला होता. मात्र तरीही सॅम करनने प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं आहे.
पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करन म्हणाला की, ‘बॉलिंगला प्राधान्य देऊ. असे दिसते की त्यांनी विकेटला थोडे पाणी घातले आहे, कदाचित काही लवकर होईल. आरसीबीला लवकर दबावाखाली आणण्याचा विचार आहे. आज आम्ही निवडलेल्या संघासह नवीन चेंडूने विकेट घेण्याचा विचार करत आहोत. आता आमच्यासाठी अगदी सोपे आहे . आमच्यासाठी काही परिणाम हवे आहेत आणि आमचे उर्वरित गेम जिंकू शकतो. लिव्हिंगस्टोन संघात आला आहे. रबाडाऐवजी त्याला घेतलं आहे. आमची ताकद आमची फलंदाजी आहे.’
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने सांगितलं की, “आम्हीही गोलंदाजी घेतली असती. आमच्यासाठी एक उत्तम बदल झाला. मागील काही गेममध्ये आम्ही क्लिनिकल आहोत. फोकस सारखाच ठेवला आहे, समोर जास्त काही नाही. त्याच पद्धतीने आम्हाला खेळायचे आहे. लॉकी फर्ग्युसनला संघात घेतलं असून मॅक्सवेलला बाहेर काढलं आहे.”
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, शशांक सिंग, सॅम कुरन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, आशुतोष शर्मा, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग, विद्वत कवेरप्पा.