बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होत आहे. या मैदानातील खेळपट्टी ही फलंदाजांना पूरक आहे. त्यामुळे धावांचा डोंगर उभा करण्यास फलंदाजांना सहज शक्य होईल. या मैदानावर आतापर्यंत एकूण 88 सामने झाले आहेत. यात धावांचा पाठलाग करणारा संघ 47 वेळा, तर पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 37 वेळा जिंकला आहे. तर चार सामन्यांचा निकाला लागला नाही. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल यात शंका नव्हती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकताच प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. कर्णधार फाफ डु प्लेसिसने सांगितलं की, “आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करू. ती खूपच चांगली विकेट दिसते पण आमचा संघ सेट झाला आहे त्यामुळे या स्पर्धेसाठी आम्ही उत्सुक आहोत. क्रिकेटच्या कोणत्याही खेळात तुमच्याकडे विकेट्सचे क्लस्टर असू शकत नाहीत. आम्हाला त्यात सुधारणा करावी लागेल. संघात कोणताही बदल केलेले नाहीत.”
नाणेफेकीचा कौल गमवल्यानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनने सांगितलं की, “आम्ही आधी गोलंदाजी केली असती. पण आता प्रथम फलंदाजी करण्यास उत्सुक आहोत. पहिल्या गेममध्ये आम्ही बऱ्याच योग्य गोष्टी केल्या आणि त्यामुळेच आम्ही विजयी झालो. आम्हाला प्रत्येक खेळात सुधारणा करत राहावे लागेल. आमच्या संघात कोणताही बदल नाही.” रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स 31 वेळा आमनेसामने आले आहेत. यात 14 सामन्यात बंगळुरुने, तर 17 सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. या स्पर्धेत पंजाब किंग्सने विजयाने सुरुवात केली होती. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर.