आयपीएल 2024 स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरु झाले आहेत. प्रत्येक संघ एकूण 14 सामने खेळणार असून आता दुसरी फेरी सुरु झाली आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात झाला. या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 176 धावा केल्या आणि विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं. होम ग्राउंडवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं पारडं जड राहिलं. बंगळुरुने 6 गडी गमवून हे आव्हान गाठलं. या विजयात विराट कोहलीची महत्त्वाची भूमिका राहिली. तसेच अवघ्या काही तासात पंजाबच्या सॅम करनकडून ऑरेंज कॅप हिरावून घेतली. रविवारी संजू सॅमसनने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध नाबाद 82 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आजच्या सामन्यात सॅम करनने 23 धावा केल्या आणि संजू सॅमसनपेक्षा 4 धावा जास्त करून कॅप खेचून घेतली होती.
सॅम करनला हे सुख जास्त काळ मिरवता आलं नाही. विराट कोहलीने 49 चेंडूत 77 धावा केल्या आणि ऑरेंज कॅप खेचून घेतली. आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहलीची एन्ट्री झाली आहे. दुसऱ्या सामन्यापासून किंग कोहली विराट कोहलीने ऑरेंज कॅप शर्यत धाव सुरु केली आहे. आता विराट कोहलीच्या नावार 98 धावा झाल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर सॅम करन असून त्याच्या नावावर 86 धावा आहेत. संजू सॅमसनच्या नावावर 82 धावा असून तिसऱ्या स्थानावर आहे. शिखर धवन 67 धावांसह चौथ्या, तर आंद्रे रसेल 64 धावांसह पाचव्या स्थानी आहे. त्यामुळे ही शर्यत दिवसागणिक अधिक चुरशीची होणार आहे.
प्लेयर्स | सामने | स्ट्राईक रेट | रन्स |
---|---|---|---|
विराट कोहली | 4 | 140.97 | 203 |
रियान पराग | 3 | 160.17 | 181 |
हेनरिक क्लासेन | 3 | 219.73 | 167 |
शुबमन गिल | 4 | 159.22 | 164 |
साई सुदर्शन | 4 | 160 | 128.00 |
विराट कोहलीने केलेल्या 77 धावांच्या खेळीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी विराट कोहली याने आरसीबीच्या चाहत्यांचे आभार मानले. लोकं माझ्या खेळीबाबत बरंच काही बोलतात. ध्येय, आकडेवारी आणि बरंच काही बोललं जातं. जेव्हा पाठी वळून पाहतो तेव्हा बराच पल्ला गाठल्याचं दिसून येतं. बऱ्याच आठवणी तयार झाल्या आहेत. मी संघाला एक चांगली सुरुवात देऊ इच्छतो. पण विकेट पडली तर त्याचं मूल्यांकन करावं लागेल. खेळपट्टी सपाट नव्हती. दुसरीकडे, सामना संपवू शकलो नाही यामुळे निराश झालो.