आयपीएल 2024 स्पर्धेतील जेतेपदाचा दावेदार कोण? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात लढत होत आहे. या संघांचे चाहते आपआपल्या संघांना पसंती देत आहेत. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चाहत्यांना पहिल्यावहिल्या जेतेपदाची उत्सुकता लागून आहे. एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. सलग सहा सामने जिंकत आरसीबीने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. तर सलग चार सामने गमवत राजस्थानची गाडी मात्र विजयाच्या रुळावरून घसरली आहे. हे चित्र पाहता स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं पारडं जड वाटत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. हे खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. पण तितकंच गोलंदाजांनाही मदत करते. खासकरून फिरकीपटू आपली कमाल दाखवू शकतात.
एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे सहा आणि राजस्थान रॉयल्स संघाचे सहा खेळाडू चमकदार कामगिरी करू शकतात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून विराट कोहली, फाफ डुप्लेसिस, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन आणि यश दयाल सामना फिरवू शकतात. तर राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसन, टॉम कोल्हेर कॅडमोर, रियान पराग, युझवेंद्र चहल आणि आवेश खान यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ 31 वेळा आमनेसामने आले आहेत. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 15 आणि राजस्थान रॉयल्से ने 13 वेळा बाजी मारली आहे. तर तीन सामने अनिर्णित ठरले आहेत.
राजस्थान रॉयल्स: टॉम कोहलर कॅडमोर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रवी अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप नगर, आवेश खान, युझवेंद्र चहल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद सिराज