IPL 2024 : आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यानंतर सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य, सांगितलं की..

| Updated on: Apr 16, 2024 | 6:28 PM

आयपीएलच्या 30व्या सामन्यात रेकॉर्ड्सचा पाऊस पडला. सनरायझर्स हैदराबादने आपलाच रेकॉर्ड मोडत मोठी धावसंख्या उभारली. तर आरसीबीनेही त्याला तोडीस तोड उत्तर दिलं. हा सामना पाहिल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने एक प्रश्न उपस्थित केला आहे. तर दिग्गज टेनिसपटू महेश भूपतीने संघ विकण्याची अपील केली आहे.

IPL 2024 : आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यानंतर सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य, सांगितलं की..
Follow us on

आयपीएल स्पर्धेतील 30 वा सामना सररायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगला. या सामन्यात षटकार आणि चौकारांचा वर्षाव पडला. दोन्ही संघांनी मिळून 549 धावा केल्या. आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्य आहे. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी गमवून 287 धावा केल्या. त्या प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 7 गडी गमवून 262 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अवघ्या 25 धावांनी पराभव झाला. मात्र या सामन्यात बरेच विक्रम नोंदवले गेले आहेत. या सामन्यात एकूण 38 षटकार आणइ 43 चौकार पडले. एकाच डावात 22 षटकार मारत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी हा विक्रम आरसीबीच्या नावावर होता.

या सामन्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने ट्वीट करून लिहिलं आहे की, “दोन्ही संघांचं पॉवर हिटिंग काय जबरदस्त होतं. 40 षटकात एकूण 549 धावा झाल्या. असं कोणाला गोलंदाज व्हावं असं वाटेल?”

दुसरीकडे, माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यानेही एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने लिहिलं की, सनरायझर्स हैदराबादचा संघ या सिझनमध्ये फक्त रेकॉर्ड बनवण्याचं काम करत आहे. तर वीरेंद्र सेहवाने सनरायझर्स हैदराबादचं कौतुक केलं आहे. सनरायझर्सच्या फलंदाज वेड्यासारखे चेंडू मारत असल्याचं सांगितलं.

टेनिसपटू महेश भूपतीनेही आरसीबीच्या पराभवानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आयपीएल, फन्स आणि खेळाडूंच्या भल्यासाठी आरसीबी टीमसाठी बीसीसीआयने नव्या मालकाचा शोध घेतला पाहीजे. जो दुसऱ्या फ्रेंचायसीसारखं या फ्रेंचायसीला स्पोर्ट्स फ्रेंचायसी बनवण्यावर काम करेल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विषक, मोहम्मद सिराज, आकाश दीप, सौरव चौहान, सुयश प्रभू , स्वप्नील सिंग, राजन कुमार, कर्ण शर्मा, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, अल्झारी जोसेफ, कॅमेरॉन ग्रीन, अनुज रावत, मनोज भंडागे, यश दयाल, हिमांशू शर्मा