IPL 2024 मध्ये नीता अंबानींच्या एका निर्णयामुळे 16 वर्षांत पहिल्यांदाच असं घडणार, रोहित ठरणार बळीचा बकरा

| Updated on: Mar 11, 2024 | 7:00 PM

IPL 2024 आधी मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटने घेतलेल्या एका निर्णयाने तब्बल 16 वर्षांनंतर पहिल्यांदच असं घडणार आहे. टीम इंडियाचा कॅप्टन असलेल्या रोहितला कर्णधारपदावरून हटवल्याने हे घडणार आहे.

IPL 2024 मध्ये नीता अंबानींच्या एका निर्णयामुळे 16 वर्षांत पहिल्यांदाच असं घडणार, रोहित ठरणार बळीचा बकरा
Follow us on

मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेला सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत.  यंदाच्या आयपीएलमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी हार्दिक पंड्या दिसणार आहे. टीम मॅनेजमेंटने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईचे चाहते नाराज झाले होते. कारण रोहित शर्मा याला कर्णधारपदावरून दूर करत त्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला. या निर्णयामुळे 16 वर्षांचा इतिहास बदलला जाणार आहे.

नीता अंबानींचा नेमका कोणता निर्णय?

आयपीएलमध्ये मुंबईच नाहीतर सनरायजर्स हैदराबाद संघाचाही कर्णधार बदलला आहे. पॅट कमिन्स याच्याकडे हैदराबाद संघावर जबाबदारी देण्यात आलीये. तर रोहित शर्माच्या जागी आता हार्दिक मैदानात दिसणार आहे. आयपीएलच्या इतिहासामध्ये असं पहिल्यंदाच घडणार आहे. टीम इंडियाचा कॅप्टन आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून दिसणार आहे.

आयपीएलचा लिलाव डिसेंबर महिन्यात पार पडला होता. त्याआधी ट्रेडिंग विन्डोमध्ये हार्दिक पंड्या याला मुंबईने आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं होतं. सुरूवातीला पंड्याबद्दल काही समजलं नाही, कारण गुदरात टायटन्स संघाचा तो कर्णधार होता. त्यामुळे मोठा मासा नीता अंबानींच्या मुंबईच्या गळाला लागला. मात्र काही दिवसांनी पंड्याला कर्णधारपद देण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निर्य़णावर मुंबईचे चाहते आक्रमक झाले होते.

रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्स संघाला पाचवेळा विजेतेपद जिंकून दिलं आहे. रोहित खेळत असतानाही त्याचा आता फक्त खेळाडू म्हणून संघात समावेश असणार आहे. आयपीएल 2008 च्या पहिल्या पर्वामध्ये एमएस धोनी टीम इंडियाचा कर्णधार होता. आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून तो सीएसके संघाचं कर्णधारपद पाहत होता.  2017 साली टीम इंडियाचा  कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळला. धोनीनंतर विराट कोहली टीम इंडियाचा पूर्णवेळ कर्णधार झाला. तोसुद्धा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळला आहे. मात्र आता रोहित पूर्णवेळ कॅप्टन असताना खेळाडू म्हणून खेळणार आहे.

मुंबई इंडियन्स आयपीएल फायनल संंघ 2024 रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमा, रोहित ब्रेव्हिस. हार्दिक पांड्या (C), जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.