मुंबई | क्रिकेट विश्वात सध्या वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगत आहे. वर्ल्ड कपच्या 34 व्या सामन्यात अफगाणिस्तानने नेदरलँड्सवर विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे सेमी फायनलच्या 3 जागांसाठी 5 संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात गुरुवारी श्रीलंकावर विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे टीम इंडिया निश्चिंत आहे. टीम इंडियाची वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पोहचण्याची सलग चौथी वेळ ठरली आहे. वर्ल्ड कपमध्ये चुरस पाहायला मिळत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे.
आयपीएल स्पर्धेत टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माच मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करतो. कॅप्टन रोहित आणि पलटणसाठी वर्ल्ड कपदरम्यान आनंदाची बातमी मिळाली आहे. मुंबई इंडियन्समध्ये आयपीएल 2024 साठी स्टार ऑलराउंडरची एन्ट्री झाली आहे. हा ऑलराउंडर किरॉन पोलार्ड याच्यासारखाच धोकादायक आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचायजीने ट्विट करत याबाबतची माहिती क्रिकेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तो क्रिकेट नक्की कोण आहे, हे आपण जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स टीममध्ये वेस्टइंडिजचा स्टार ऑलराउंडर रोमरियो शेफर्ड याची एन्ट्री झाली आहे. रोमारियोसाठी मुंबई इंडियन्सने 50 लाख रुपये मोजले आहेत. रोमारियोसाठी मुंबईने लखनऊ सुपर जायंट्ससोबत 50 लाखांचा व्यवहार केला आहे. रोमारियो याआधी लखनऊ टीममध्ये होता. रोमारियोला आयपीएलमध्ये खेळण्याचा फारच कमी अनुभव आहे. रोमारियो याने आयपीएलमध्ये 4 सामनेच खेळले आहेत.
रोमारियो शेफर्ड याचा मुंबई इंडियन्समध्ये समावेश
𝗟𝗨𝗖𝗞𝗡𝗢𝗪 𝓼𝓮 𝗠𝗨𝗠𝗕𝗔𝗜 🤩
We have acquired the services of West Indian All Rounder ℝ𝕠𝕞𝕒𝕣𝕚𝕠 𝕊𝕙𝕖𝕡𝕙𝕖𝕣𝕕 following a successful trade with LSG.#OneFamily #MumbaiIndians #MumbaiMeriJaan #IPL pic.twitter.com/6jEDhQt8lp
— Mumbai Indians (@mipaltan) November 3, 2023
रोमारियो शेफर्ड याने 25 एकदिवसीय आणि 31 टी 20 सामन्यांमध्ये वेस्टइंडिजचं प्रतिनिधित्व केलंय. रोमारियोने वनडेत 284 आणि टी 20 मध्ये 301 धावा केल्या आहेत. तसेच रोमारियोने वनडेत 20 आणि टी 20 मध्ये 31 विकेट्स मिळवल्या आहेत. रोमारियोच्या नावावर आयपीएलमध्ये 4 मॅचमध्ये 58 धावा आणि 3 विकेट्स आहेत.
दरम्यान आयपीएल 2024 चा लिलाव हा दुबईत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 19 डिसेंबरला दुबईतील कोका-कोला एरेनामध्ये लिलाव पार पडणार आहे. भारतात 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे लिलाव परदेशात होणार असल्याचंही म्हटलं जातंय.