आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांमध्ये पंधरावा सामना होत आहे. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने टॉस जिंकत बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आरसीबीच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण आतापर्यंत दोन्ही संघांनी फक्त एका सामन्यात विजय मिळवलाय. आजच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये दोन्ही संघांनी एक-एक बदल केला आहे. यामध्ये लखनऊ संघाला धक्का बसला आहे. स्टार बॉलर मोहसीन खान संघाबाहेर झाला आहे. तर आरसीबीने परदेशी रीस टॉपले याचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला आहे. अल्सारी जोसेफ याला संघातून बाहेर करण्यात आलं आहे.
लखनऊ सुपर जायंट्स संघामधील युवा बॉलर मयंक यादव याच्याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. मागील पंजाबविरूद्ध पदार्पण करताना घातक गोलंदाजीने सर्वांनाच आचंबित केलं होतं. आजच्या सामन्यात मयंकसमोर विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि मॅक्सवेलसारख्या तगड्या फलंदाजांचं आव्हान असणार आहे.
आजच्या सामन्यात विराट कोहलीकडेह सर्वांच्या नजरा असणार आहेत. मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस यांना अजून काही फॉर्म सापडलेला दिसत नाही. त्यामुळे कोहलीच्या खांद्यावरच फलंदाजीची भिस्त असणार आहे. मात्र इतर फलंदाज म्हणजे कैमरून ग्रीन,रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज राव यांच्याकडूनही अपेक्षा असणार आहेत.
दरम्यान, पॉईंट टेबलमध्ये आता पाहिलं तर लखनऊचे दोन सामने झालेत. यामधील एका सामन्यात त्यांना पराभवाचा तर दुसऱ्या सामन्यात पहिला विजय मिळवला होता. तर आरसीबीचे तीन सामने झाले असून यामधील दोन सामन्यातील फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आलाय. दर दोन सामन्यात पराभव झाला आहे.
रॉयल चैलेंजर्स बंगळुरु (प्लेइंग इलेवन): विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (C), कैमरून ग्रीन, ग्लेन मैक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (WK), रीस टॉपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेवन): क्विंटन डी कॉक (WK), केएल राहुल (C), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, रवि बिश्नोई, यश ठाकुर, नवीन-उल-हक, मयंक यादव