आयपीएल 2024 स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गमावला. चेन्नई सुपर किंग्सने 6 विकेट्स आणि 8 चेंडू राखून जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सला पराभूत करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयाच्या ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न केला. आरसीबीने पंजाब विरुद्धचा सामना 4 विकेट्स राखून जिंकला. मात्र त्यानंतर पराभवाची मालिका सुरु झाली. त्यानंतर आरसीबीने सलग सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. त्यानंतर कोलकात्याने 7 विकेट्स आणि 19 चेंडू, लखनौने 28 धावांनी, राजस्थान रॉयल्सने 6 विकेट आणि पाच चेंडू, मुंबई इंडियन्सने 7 विकेट आमि 27 चेंडू, हैदराबादने 25 धावांनी , कोलकात्याने एका धावेने पराभूत केलं. मात्र त्यानंतर आरसीबीने जबरदस्त कमबॅक करत सलग सहा सामन्यात विजय मिळवला. 3 मे रोजी जाहीर झालेल्या गुणतालिकेवर नजर टाकली तर आरसीबीचा संघ दहाव्या स्थानावर होता. मात्र 15 दिवसातच जादूची कांडी फिरवल्यासारखं घडलं आणि गुणतालिकेत चौथ्या स्थानावर स्थान मिळवण्यात यश आलं.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पुन्हा एकदा सिद्ध केले की स्पर्धेत काहीही अशक्य नाही. हैदराबादला 35 धावांनी पराभूत करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विजयाच्या ट्रॅकवर परतली. गुजरातला 9 विकेट्स आणि 24 चेंडू राखून, गुजरातला 4 विकेट्स आणि 34 चेंडू राखून, पंजाबला 60 धावांनी, दिल्लीला 47 धावांनी, चेन्नई सुपर किंग्सला 27 धावांनी पराभूत केलं चौथ्या स्थानावर झेप घेण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सातव्या स्थानावर होता. मात्र चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत 14 गुण झाले. तसेच नेट रनरेट चांगला असल्याने प्लेऑफमध्ये स्थानही मिळवलं. आता एलिमिनेटर सामन्यासाठी पात्र ठरलेल्या आरसीबीला आणखी एका करो किंवा मरोचा सामना करावा लागणार आहे. 22 मे रोजी अहमदाबाद येथे होणारा हा सामना आरसीबीने जिंकल्यास क्वालिफायर-2 साठी पात्र ठरतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अंतिम फेरीत पोहोचेल की नाही हे पाहावे लागेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, स्वप्नील सिंग, अनुज रावत , सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार विशक, हिमांशू शर्मा, मयंक डागर, मनोज भंडागे, टॉम कुरन, अल्झारी जोसेफ, आकाश दीप, सौरव चौहान, राजन कुमार