रियान पराग आणि कॅप्टन संजू सॅमसन या दोघांनी केलेल्या वादळी अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने गुजरातला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 196 धावा केल्या. राजस्थानकडून रियान पराग याने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. तर संजू सॅमसन याने नाबाद 68 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल याने 24 आणि जॉस बटलर याने 8 धावांचं योगदान दिलं. तर शिमरॉन हेटमायर नॉट आऊट 13 रन्स करुन परतला. गुजरातकडून उमेश यादव, राशिद खान आणि मोहित शर्मा या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
राजस्थानच्या यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर या दोघांनी आश्वासक सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 32 धावा जोडल्या. यशस्वी 24 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर 42 धावांवर राजस्थानला दुसरा धक्का लागला. जॉस बटलर 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर रियान पराग आणि संजू सॅमसन या दोघांनी कारनामा केला. संजू आणि रियान या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 83 बॉलमध्ये 130 धावांची भागीदारी केली. रियानचं या भागीदारीत सर्वाधिक योगदान राहिलं. रियानने 48 बॉलमध्ये 76 धावा केल्या. तर संजूने 33 बॉलमध्ये 49 रन्स केल्या.
रियान पराग याने 48 बॉलमध्ये 3 फोर आणि 5 सिक्ससह 158.33 च्या स्ट्राईक रेटने 76 धावांची खेळी केली. तर संजू सॅमसन 2 षटकार आणि 7 चौकारांसह 178.95 च्या स्ट्राईक रेटसह नाबाद 68 धावा करुन परतला. या दोघांनी केलेल्या खेळीमुळे राजस्थानला 190 पार मजल मारता आली. दरम्यान आता राजस्थानचे गोलंदाज 197 या धावांचा बचाव करत विजयाचा पंच मारणार की गुजरात त्यांना रोखणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
संजू-रियानने गाजवलं
Innings Break!
Fabulous fifties from Riyan Parag & Captain Sanju Samson power @rajasthanroyals to 196/3 🙌
Will it be enough for #GT? Find out 🔜
Scorecard ▶️ https://t.co/1HcL9A8zMJ#TATAIPL | #RRvGT pic.twitter.com/8ooKGHvq01
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2024
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुभमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (विकेटकीर), राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद आणि मोहित शर्मा.