आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 70 व्या आणि साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. श्रेयस अय्यर कोलकाताचं नेतृत्व करणार आहे. तर संजू सॅमसन याच्याकडे राजस्थानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. केकेआरने या हंगामातील 13 पैकी 9 सामने जिंकले आहेत. तर राजस्थानने 13 मधून 8 वेळा विजय मिळवला आहे. केकेआर आणि राजस्थान दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहचले आहेत. मात्र त्यानंतरही दुसरं स्थान कायम राखण्यासाठी राजस्थानसाठी हा निर्णायक सामना असणार आहे.
राजस्थान विरुद्ध केकेआर सामना रविवारी 19 मे रोजी होणार आहे.
राजस्थान विरुद्ध केकेआर सामना गुवाहाटीमधील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
राजस्थान विरुद्ध केकेआर सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
राजस्थान विरुद्ध केकेआर सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
राजस्थान विरुद्ध केकेआर सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.
राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोव्हमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, रविचंद्रन अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर , युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.
कोलकाता नाईट रायडर्स टीम : श्रेयस अय्यर (कॅप्टन), श्रीकर भारत, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रमणदीप सिंग, नितीश राणा, शेरफेन रदरफोर्ड, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, वैभव अरोरा, दुष्मंथा चमीरा, हर्षित राणा, मुजे राणा रहमान, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, साकिब हुसेन, अंगक्रिश रघुवंशी आणि फिलिप सॉल्ट.