आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 65 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करणार आहे. तर शिखर धवन याच्या अनुपस्थितीत सॅम करन याच्याकडे पंजाब किंग्सच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. राजस्थान आणि पंजाब दोन्ही संघांचा हा या हंगामातील 13 वा सामना आहे. राजस्थानने 13 पैकी 8 सामने जिंकले आहेत. राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये 16 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर पंजाबने 12 पैकी फक्त 4 सामने जिंकलेत. पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानी आहे.
राजस्थान आणि पंजाब दोन्ही संघ या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने असणार आहेत. उभयसंघात याआधी 13 एप्रिल रोजी सामना झाला होता. राजस्थानने हा सामना 3 विकेट्सने जिंकले होता. पंजाबचं या हंगामातील आव्हान संपु्ष्टात आलं आहे. तर दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉय्लस प्लेऑफच्या वेशीवर आहे. त्यामुळे पंजाबकडे हा सामना जिंकून गेल्या पराभवाचा वचपा घेत राजस्थानची प्लेऑफची वाट अडवण्याची दुहेरी संधी आहे. राजस्थानने प्लेऑफसाठी आवश्यक आण किमान 16 पॉइंट्स मिळवले आहेत. मात्र राजस्थान अधिकृतरित्या प्लेऑफसाठी पात्र ठरलेले नाहीत. त्यामुळे पंजाबने राजस्थानला पराभूत केलं, तर शेवटच्या आणि 14 व्या सामन्यात राजस्थानचं टेन्शन वाढेल.
राजस्थान विरुद्ध पंजाब सामना बुधवारी 15 मे रोजी होणार आहे.
राजस्थान विरुद्ध पंजाब सामना बारसपारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे होणार आहे.
राजस्थान विरुद्ध पंजाब सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
राजस्थान विरुद्ध पंजाब सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरीक चॅनेल्सवर पाहता येईल.
राजस्थान विरुद्ध पंजाब सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर फुकटात पाहायला मिळेल.
पंजाब किंग्स टीम : शिखर धवन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, हरप्रीत सिंग भाटिया, प्रभसिमरन सिंग, रायली रोसो, जितेश शर्मा, सॅम कुरान, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, शिवम सिंग, सिकंदर रझा, अथर्व तायडे, ख्रिस वोक्स, अर्शदीप सिंग, राहुल चहर, नाथन एलिस, हरप्रीत ब्रार, विद्वथ कवेरप्पा, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, प्रिन्स चौधरी, आशुतोष शर्मा, विश्वनाथ सिंग आणि तनय त्यागराजन.
राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोव्हमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, रविचंद्रन अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.