आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 65 व्या सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सला विजयासाठी 145 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 7 बॉल राखून आणि 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पंजाबने 18.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 145 धावा केल्या. कॅप्टन सॅम करन हा पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला. तर अखेरीस जितेश शर्मा आणि आशुतोष शर्मा या दोघांनी चांगली साथ दिली. पंजाबचा हा या हंगामातील एकूण पाचवा विजय ठरला. तर राजस्थानचा हा सलग चौथा पराभव ठरला.
सॅम करन आणि आशुतोष शर्मा या जोडीने पंजाबला विजयापर्यंत पोहचवलं. ही जोडी नाबाद परतली. सॅमने 41 बॉलमध्ये 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 63 धावांची खेळी केली. तर आशुतोषने नॉट आऊट 17 रन्स केल्या. त्याआधी जितेश शर्मा याने 22 धावांचं योगदान दिलं. शशांक सिंह याला भोपळाही फोडता आला नाही. रायली रुसो याने 22 धावा जोडल्या. जॉनी बेयरस्टोने 14 धावांचं योगदान दिलं. तर प्रभसिमरन सिंहने 6 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. राजस्थानकडून युझवेंद्र चहल आणि आवेश खान या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्टच्या खात्यात 1 विकेट गेली.
त्याआधी राजस्थानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र राजस्थान सलग दुसऱ्यांदा 150 पार पोहचण्यात अपयशी ठरली. यशस्वी जयस्वाल 4, कॅप्टन संजू सॅमसन आणि टॉम कोल्हर कॅडमोर या दोघांनी प्रत्येकी 18 धावा केल्या. आर अश्विन याने 28 धावांचं योगदान दिलं. मात्र त्यानंतर राजस्थानचा डाव गडगडत असताना रियान पराग याने राजस्थानची लाज राखली. रियानने 34 बॉलमध्ये 48 धावांची खेळी केली. त्यामुळे राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 144 धावांपर्यंत पोहचता आलं. पंजाबकडून सॅम करन, हर्षल पटेल आणि राहुल चहर या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंह आणि नॅथन एलिस या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
सॅम करनची ऑलराउंड कामगिरी
A captain’s show with both bat & ball helps Sam Curran bag the Player of the Match Award 🏆
Scorecard ▶️ https://t.co/IKSsmcpSsa#TATAIPL | #RRvPBKS | @CurranSM pic.twitter.com/ehwygeCLh9
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2024
पंजाब किंग्ज प्लेईंग इलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नॅथन एलिस, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान आणि युझवेंद्र चहल.