आयपीएलच्या 17 व्या मोसमात सलग 6 सामने गमावल्यानंतर फाफ डु प्लेसिस याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सलग 6 सामने जिंकून प्लेऑफमध्ये मोक्याच्या क्षणी धडक मारली. बुधवारी 22 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात एलिमिनेटर सामान पार पडला. राजस्थान रॉयल्सने या सामन्यात विजय मिळवला. राजस्थानने आरसीबीचा विजय रथ रोखला. आरसीबीचं या पराभवासह यंदाही आयपीएल चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंग झालं. आरसीबीच्या पराभवानंतर दिग्गज विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिक याने चाहत्यांचा निरोप घेतला. कार्तिकने सर्वांचे आभार मानले. तसेच आरसीबी आणि राजस्थान दोन्ही संघांच्या खेळाडूंनी त्याला अभिवादन केलं.
आरसीबीच्या गोटात पराभवानंतर नाराजीचं वातावरण होतं. आपण पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचं खेळाडूंच्या चेहऱ्यावरुन जाणवत होतं. खेळाडूंचं खांदे आणि चेहरही पडले होते. आरसीबीच्या पराभवानंतर तसेच चाहत्यांचा निरोप घेतल्यानंतर दिनेश कार्तिकने अखेरची प्रतिक्रिया दिली आहे. आरसीबीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स खात्यावरुन ड्रेसिंग रुममधील एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओतून आरसीबीच्या पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये काय स्थिती होती, याचा अंदाज बांधता येईल.
आरसीबीने पोस्ट केलेल्या ड्रेसिंग रुममधील व्हीडिओत कार्तिकने आपली अखेरची प्रतिक्रिया दिली. “खेळात परीकथेसारखा शेवट नसतो”, अशी 4 शब्दात दिनेश कार्तिकने प्रतिक्रिया दिली. तसेच कार्तिकने बरंच काही सांगितलं. दरम्यान कार्तिकने आरसीबीचा या हंगामातील शेवटच्या ठरलेल्या एलिमिनेटर सामन्यामध्ये 13 चेंडूत 1 चौकारासह 11 धावांची खेळी केली. तसेच राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू समॅसन याला स्टंपिंग केलं.
कार्तिकची प्रतिक्रिया
Unfortunately, sport is not a fairytale and our remarkable run in #IPL2024 came to an end. Virat Kohli, Faf du Plessis and Dinesh Karthik express their emotions and thank fans for their unwavering support. ❤️#PlayBold #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/FYygVD3UiC
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 23, 2024
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकटेकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.