आयपीएलच्या 17 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं. आरसीबीकडून रजत पाटीदार, विराट कोहली आणि महिपाल लोमरुर या तिघांनी अनुक्रमे 34, 33 आणि 32 अशा धावा केल्या. या तिघाच्या 30 पेक्षा अधिक धावांच्या जोरावर आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 172 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त इतर फलंदाजांना काही करता आलं नाही. तर दुसऱ्या बाजूला वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये चेसिंग करताना द्विशतक ठोकणाऱ्या ग्लेन मॅक्सवेल याने सपशेल निराशा केली. ग्लेन मॅक्सवेल पहिल्याच बॉलवर आवेश खान याच्या बॉलिंगवर ध्रुव जुरेल याच्या हाती कॅच आऊट झाला. गोल्डन डक झाल्याने जोरदार टीका होत असताना ग्लेन मॅक्सवेलने आरसीबीच्या अडचणीत आणखी भर घातली.
राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि टॉम कोल्हेर कॅडमोर ही सलामी जोडी मैदानात आली. कॅमरुन ग्रीन याने यश दयालच्या बॉलिंगवर स्लीपमध्ये तिसऱ्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर यशस्वी जयस्वाल याचा कॅच सोडला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल याने पाचव्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर टॉम कोल्हेर कॅडमोर याचा सोपा कॅच सोडला. त्यामुळे भरमदैानात विराटनेही जाहीर नाराजी व्यक्त केली. ग्लेन मॅक्सवेल त्याच्या विस्फोटक बॅटिंग आणि फिल्डिंगसाठी ओळखला जातो. मात्र त्याने या हंगामात निराशाजनक कामगिरी केलीय.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू इम्पॅक्ट प्लेअर्स : स्वप्नील सिंग, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार वैशाख आणि हिमांशू शर्मा.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकटेकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.
राजस्थान रॉयल्स इम्पॅक्ट : शुभम दुबे, डोनोवन फरेरा, नांद्रे बर्गर, शिमरॉन हेटमायर आणि तनुष कोटियन.