Virat Kohli : यश दयालला शिवीगाळ, बॉटल फेकली, विराटवर गंभीर आरोप

| Updated on: May 23, 2024 | 7:14 PM

Virat Kohli Rcb Ipl 2024: आरसीबीचं पुन्हा एकदा आयपीएल चॅम्पियन होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. राजस्थानने आरसीबीवर एलमिनेटर सामन्यात विजय मिळवला. या दरम्यान विराट कोहलीचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Virat Kohli : यश दयालला शिवीगाळ, बॉटल फेकली, विराटवर गंभीर आरोप
virat kohli and yash dayal
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सलग सहा सामन्यानंतर एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीचं आव्हान पराभवासह संपुष्टात आलं. आरसीबीने राजस्थानला विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं होतं. राजस्थानने हे आव्हान 19 ओव्हरमध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. राजस्थानने या विजायसह क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली. आरसीबीच्या पराभवानंतर विराट कोहली याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हीडिओद्वारे विराटवर सोशल मीडियावर सहकारी खेळाडू यश दयाल याला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाही, तर विराटने बॉटल फेकत आपला राग व्यक्त केला. नक्की हा सर्व प्रकार केव्हा झाला? हे जाणून घेऊयात.

नक्की काय झालं?

यश दयाल राजस्थानच्या डावातील 17 वी ओव्हर टाकायला आला. यशने पहिल्या 2 चेंडूत 2 धावा दिल्या. त्यानंतर यश निष्प्रभ ठरला. यशच्या पुढील 2 चेंडूत राजस्थानच्या शिमरॉन हेटमायर याने सलग 2 चौकार लगावले. दयालने तिसरा बॉल फुलटॉस टाकत ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. त्यानंतर विराटचा पारा चढला. विराटने रागाच्या भरात बाउंड्री लाईनवर फिल्डिंग दरम्यान एनर्जी ड्रिकं घेतल्यानंतर बॉटल फेकली. इतकंच नाही, तर विराट काही तरी पुटपुटलाही. विराटने यशला शिवीगाळ केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.

दरम्यान निर्णायक सामन्यात आरसीबीचे फलंदाज निष्प्रभ ठरले. आरसीबीच्या एकालाही मोठी खेळी करता आली नाही. कॅप्टन फाफ डु प्लेसीस याने 17, विराट कोहली याने 33, कॅमरुन ग्रीन 27 आणि रजत पाटीदार याने 34 धआवांचं योगदान दिलं. या चौघांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र एकालाही मोठी खेळी करता आली नाही. आरसीबीने अशाप्रकारने राजस्थानसमोर 173 धावांचं आव्हान ठेवलं. राजस्थानने हे आव्हान 6 बॉल राखून 6 विकेट्स गमावून रडतरडत का होईना पूर्ण केलं.

विराट संताप

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकटेकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.