आयपीएलच्या 17 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. राजस्थानने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दोन्ही संघांसाठी हा आरपारचा सामना आहे. जिंकणारी टीम क्वालिफायर 2 मध्ये सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळेल. तर पराभूत संघाचं आव्हान इथेच संपुष्टात येईल. त्यामुळे दोन्ही संघांनी पहिल्या डावात जोरदार प्रयत्न केले. आरसीबीचा पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याचा निर्धार होता. तर राजस्थानसमोर आरसीबीच्या बॅटिंगला ब्रेक लावण्याचं आव्हान होतं. आरसीबीला विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. विराटला चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याला सामन्याच्या महत्त्वानुसार मोठी खेळी करता आली नाही.
विराट कोहलीने राजस्थान विरुद्ध 24 चेंडूत 33 धावा केल्या. विराटने या खेळीदरम्यान 3 चौकार आणि 1 सिक्स ठोकला. विराटची आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात प्लेऑफमध्ये फारशी चांगली कामगिरी राहिलेली नाही. विराटने प्लेऑफमधील 15 डावांमध्ये 26.33 च्या सरासरी आणि 122.66 च्या स्ट्राईक रेटने 2 अर्धशतकांच्या मदतीने 341 धावा केल्या आहेत. तसेच विराटने एलिमिनेटरमध्ये 12, 6, 39, 25 आणि 33 अशा धावा केल्या आहेत.
विराटने 2015 साली राजस्थान विरुद्ध एलिमिनेटरमध्ये 12 धावा केल्या. त्यानंतर 2020 साली सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 6 धावा केल्या. केकेआर विरुद्ध 2021 साली 39, लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 25 आणि आता राजस्थान रॉयल्स विरुद्ध 33 धावा केल्या आहेत. तसेच या निर्णायक सामन्यात आरसीबीच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आलं नाही. इतकंच काय, तर ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याच्याकडून चाहत्यांना मोठ्या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र मॅक्सवेला भोपळाही फोडता आला नाही. मॅक्सवेल पहिल्याच बॉलवर आऊट झाला. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 172 पर्यंत मजल मारली. त्यामुळे आता आरसीबी या धावांचा यशस्वी बचाव करणार का? याकडे लक्ष असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू इम्पॅक्ट प्लेअर्स : स्वप्नील सिंग, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार वैशाख आणि हिमांशू शर्मा.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकटेकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.
राजस्थान रॉयल्स इम्पॅक्ट : शुभम दुबे, डोनोवन फरेरा, नांद्रे बर्गर, शिमरॉन हेटमायर आणि तनुष कोटियन.