IPL 2024 : ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, आयपीएल खेळण्याबाबत कोच रिकी पाँटिंगने दिली मोठी अपडेट

| Updated on: Feb 07, 2024 | 4:02 PM

आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या सहा आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. यासाठी सर्वच फ्रेंचायसीने कंबर कसली आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघाची डोकेदुखी अजूनही कायम आहे. ऋषभ पंतच्या खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. असं असताना हेड कोच रिकी पाँटिंगने सूचक वक्तव्य केलं आहे.

IPL 2024 : ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, आयपीएल खेळण्याबाबत कोच रिकी पाँटिंगने दिली मोठी अपडेट
IPL 2024 : ऋषभ पंत आयपीएल 2024 स्पर्धा खेळणार की नाही? हेड कोच रिकी पाँटिंगच्या सूचक वक्तव्याने खळबळ
Follow us on

मुंबई : ऋषभ पंतने भारतीय क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्याची उणीव वारंवार टीम इंडिया आणि फ्रेंचायसीला भासत आहे. एका अपघाताने सर्वच चित्र बदलून टाकलं. ऋषभ पंत गेल्या एक वर्षापासून क्रिकेटपासून दूर आहे. कमबॅकसाठी त्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर कमबॅक करेल अशी आशा होती. पण त्याच्या दुखापतीत तितकी काही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आता आयपीएल 2024 स्पर्धा खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. आता दिल्ली कॅपिटल्सचे हेड कोच रिकी पाँटिंग यांनी ऋषभ पंतबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ऋषभ पंत आयपीएलमध्ये खेळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पण विकेटकीपिंग आणि कर्णधारपद भूषवणार की नाही याबाबत शंका आहे. जर तसं झालं तर ऋषभ पंतऐवजी डेविड वॉर्नर कर्णधारपद भूषवेल.

हेड कोच रिकी पाँटिंगने काय सांगितलं?

“ऋषभला आयपीएलसाठी पूर्णपणे फीट होईल असा विश्वास आहे. पण त्याची क्षमता किती असेल याबाबत माहिती नाही. सोशल मीडियावर तुम्ही त्याच्याबाबत बरंच काही बघितलं असेल. चांगला धावत आहे. पण पहिला सामना होण्यासाठी फक्त 6 आठवड्यांचा अवधी आहे. त्यामुळे विकेटकीपिंग करेल की नाही याबाबत माहिती नाही. पण त्याला याबाबत विचारलं तर तो सांगेल की खेळणार, कीपिंग करणार आणि 4 नंबरवर फलंदाजी करणार. त्याचा स्वभाव असाच आहे.”, असं रिकी पाँटिंगने सांगितलं.

“ऋषभ पंत एक जबरदस्त खेळाडू आहे. खरं तर तो आमचा कर्णधार आहे. मागच्या वर्षी त्याची उणीव दिसून आली. त्याच्या 12-13 महिन्यांचा प्रवास खरंच भयावह होता. तो स्वत:ला या बाबतीत नशिबवान समजतो. परत क्रिकेट खेळण्याची संधी मिळणं ही तर खूपच लांबची बाब आहे. आम्हाला आशा आहे की तो खेळताना दिसेल. प्रत्येक सामना खेळला नाही तरी चालेल पण कमीत कमी 10 सामने खेळायला हवेत असं आम्हाला वाटत.”, असं रिकी पॉटिंगने सांगितलं.

ऋषभ पंतचं डिसेंबर 2022 मध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातातून बचवल्यानंतर त्याच्या पायावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर एनसीएमध्ये त्याने गेल्या काही वर्षापासून मेहनत घेतली आहे. आयपीएल मिनी ऑक्शनमध्येही त्याने भाग घेतला होता.