चेन्नई सुपर किंग्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं आहे. सीएसकेने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. चेन्नईच्या एकूण 7 फलंदाजांनी बॅटिंग केली. सर्वांना आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र त्यांना हैदराबादच्या धारदार बॉलिंगसमोर या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. त्यामुळे चेन्नईला 170 च्याआधीच रोखण्यात हैदराबादरला यश आलं. आता चेन्नईचे गोलंदाज 166 धावांचा यशस्वी बचाव करतात की हैदराबाद बाजी मारणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सकडून शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर जोडीने सर्वाधिक धावा केल्या. शिवमने 24 बॉलमध्ये 187.50 च्या स्ट्राईक रेटने 4 सिक्स आणि 2 फोरसह 45 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणे याने 30 बॉलमध्ये 2 चौकार आणि 1 षटकारासह 116.67 च्या स्ट्राईक रेटने 35 रन्स जोडल्या. रवींद्र जडेजा याने 23 बॉलमध्ये 4 फोरसह नॉट आऊट 31 रन्स केल्या.
कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने 26 धावांचं योगदान दिलं.
डॅरेल मिचेल याने 13 आणि रचीन रवींद्र याने 12 धावा केल्या. तर विकेटकीपर बॅट्समन महेंद्रसिंह धोनी 1 धावेवर नाबाद परतला. तर हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, कॅप्टन पॅट कमिन्स, शाहबाज अहमद आणि जयदेव उनाडकट या 5 जणांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
हैदराबाद चेन्नईला रोखण्यात यशस्वी
Innings Break!
An impressive comeback from #SRH bowlers restrict #CSK to 165/5
Which team will get 🔙 to winning ways?🤔
Scorecard ▶️ https://t.co/O4Q3bQNgUP #TATAIPL | #SRHvCSK pic.twitter.com/34IwVR5dQB
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2024
हेड टु हेड रेकॉर्ड्स
चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण 19 सामने झाले आहेत. त्यापैकी 14 सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली आहे. तर फक्त 5 सामन्यात हैदराबादला विजय मिळवता आला आहे. त्यामुळे हैदराबाद आता चेन्नई विरुद्ध सहावा विजय मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेईंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.