IPL 2024, SRH vs CSK : हैदराबाद चेन्नई आमनेसामने, हे खेळाडू बजावतील महत्त्वाची भूमिका

| Updated on: Apr 04, 2024 | 3:00 PM

आयपीएल स्पर्धेत एक एक करत सामने पुढे सरकत आहेत. आता 18 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पण विजयाची चावी काही खेळाडूंच्या हाती असणार आहे. चला जाणून घेऊयात याबाबत

IPL 2024, SRH vs CSK : हैदराबाद चेन्नई आमनेसामने, हे खेळाडू बजावतील महत्त्वाची भूमिका
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेतील 18वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांची जबरदस्त फाईट पाहायला मिळणार आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वात हैदराबादने 3 पैकी 1 सामना जिंकला आहे. पण हरलेल्या दोन्ही सामन्यात बऱ्यापैकी झुंज दिली. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ससमोर मोठं आव्हान असणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात रंगणार आहे. याच मैदानात मुंबई विरुद्ध हैदराबाद हा सामना रंगला होता. तेव्हा षटकार आणि चौकारांचा वर्षाव झाला होता. आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हैदराबादने केला होता. मुंबई विरुद्ध 277 धावांची खेळी केली होती. तर दोन्ही बाजूने मिळून 523 धावा झाल्या होत्या. त्यामुळे या सामन्यातही धावांचा वर्षाव होणार यात शंका नाही. चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण 19 सामने झाले आहेत. त्यापैकी 14 सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली आहे. तर फक्त 5 सामन्यात हैदराबादला विजय मिळवता आला आहे.

या सामन्यात हैदराबादचे 5 आणि चेन्नईचे 6 खेळाडू महत्त्वाचे ठरतील. हैदराबादकडून हेन्रिक क्लासेन, ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, पॅट कमिन्स हे खेळाडू सामना फिरवण्याची ताकद ठेवतात. तर चेन्नई सुपर किंग्सकडून शिवम दुबे, रचिन रविंद्र, ऋतुराज गायकवाड,डेरील मिचेल, रवींद्र जडेजा आणि मथीशा पथिराना सामना फिरवू शकतात. त्यामुळे या 11 खेळाडूंवर सामन्याची धुरा असण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धी संघांनी ही बाजू मोडून काढली तर विजय सहज सोपा होईल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

सनरायझर्स हैदराबाद : राहुल त्रिपाठी, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट

चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे , डॅरिल मिशेल, मोईन अली, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पाथीराणा.

या ठिकाणी पाहता येईल सामना

शुक्रवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. दुसरीकडे, चाहते सामन्याचे थेट प्रक्षेपण विनामूल्य पाहण्यासाठी Jio Cinema मोबाइल ॲपवर स्विच करू शकतात.