SRH vs GT सामना रद्द होणं हैदराबादसाठी फायदेशीर की डोकेदुखी? जाणून घ्या

| Updated on: May 16, 2024 | 10:06 PM

IPL 2024 SRH Playoffs Scenario : हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना रद्द झाल्यास हैदराबादला फायदा होणार की तोटा?

SRH vs GT सामना रद्द होणं हैदराबादसाठी फायदेशीर की डोकेदुखी? जाणून घ्या
daniel vittory and pat cummins srh ipl 2024
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमात आता अखेरचे काही सामने बाकी आहेत. प्लेऑफसाठी कोलकाता नाईट रायडर्सनंतर राजस्थान रॉयल्सने क्वालिफाय केलंय. या हंगामातील 66 व्या सामन्यात आज 16 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पावसामुळे 9 वाजून 30 मिनिटांपर्यंत पाऊस थांबवण्याचं नाव घेत नाहीय.

पावसाची रिपरिप अधूनमधून सुरु असल्याने ग्राउंड स्टाफलाही खेळपट्टी कोरडी करण्यात अडथळा येत आहे. अशात सामना रद्द होण्याची दाट शक्यता आहे. हैदराबादसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. अशात हा सामना पावसामुळे रद्द झाला हैदराबादला फायदा होणार की तोटा? हे जाणून घेऊयात.

गुजरात टायटन्सचं आव्हान संपुष्टात आलय. त्यामुळे गुजरातला तसा काही फरक पडणार नाही. मात्र हैदराबादसाठी सामना महत्त्वाचा आहे. हैदराबाद पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. हैदराबादच्या नावावर 14 पॉइंट्स आहेत. सामना रद्द झाल्यास हैदराबाद आणि गुजरातला प्रत्येकी 1-1 सामना मिळेल. त्यामुळे हैदराबादचे 15 पॉइंट्स होतील. हैदराबाद या विजयासह प्लेऑफसाठी क्वालिफाय करेल. इतकंच नाही, हैदराबाद यासह चेन्नईला पछाडत पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी पोहचेल. चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा आणि उमरान मलिक.

गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, ऋद्धिमान साहा, साई सुधारसन, शाहरुख खान, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, अजमतुल्ला ओमरझाई, अभिनव मनोहर, रशीद खान, विजय शंकर, राहुल तेवतिया, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, नूर अहमद, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहित शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, सुशांत मिश्रा, संदीप वॉरियर, शरथ बीआर आणि मानव सुथर.